sharad pawar slams raj thackeray without mentioning his name Saam Tv
महाराष्ट्र

...म्हणून मी फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेतो; पवारांचा राज ठाकरेंना टोला

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) ते बोलत होते. शरद पवार (Sharad Pawar) हे फुले, शाहू, आंबेडकर याचंच नाव का घेतात असं विचारतात, प्रबोधनकार ठाकरे यांनी या संदर्भात खूप लिखाण केले ते वाचलं तर असा प्रश्न कुणी विचारणार नाही असं म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे. पवार म्हणाले की, या देशात अनेकांची राज्य झाली, पण शिवाजी महाराजांनी उभे केलेलं रयतेचे राज्य होते. त्यामुळे ३०० वर्ष होऊन गेली, तरीही शिवाजी महाराज सर्वसामान्यांच्या अंतःकरणात आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव का घेतात, त्यासाठी महाराष्ट्र समजून घेतला पाहिजे. परवा एका नेत्यांनी आपल्या भाषणात पवार फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतात असा उल्लेख केला होता असं म्हणत पवारांनी राज ठाकरेंच नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. (sharad pawar slams raj thackeray without mentioning his name)

हे देखील पाहा -

...म्हणून मी फुल्यांचं नाव घेतो

पवार पुढे म्हणाले की, महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई यांनी सर्वसामान्यांना शिकवलं. आज फुले असतील नसतील पण त्याचं योगदान संपणार नाही. ज्यावेळी संपूर्ण समाज अस्वस्थ होता त्यावेळी या समाजाचे सत्व जागं करण्याचं काम करून शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्याचं राज्य नव्हतं ते रयतेचं राज्य होतं. इंग्लडचा राजा भारतात आला तेव्हा महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशात भेटायला गेले. त्यावेळी राज्यात दुष्काळ होता आणि त्यांनी पाझर तलाव निर्माण करण्याची मागणी केली, शेतीला जोडधंदा हवा, यासाठी गाई समृद्ध झाल्या पाहिजे त्यासाठी गाईंची नवीन जात आना अशी मागणी केली. तज्ज्ञांच्या मदतीने शेतीचं उत्पादन वाढवा यासाठी संकरित वाण आणावं अशी मागणी केली म्हणून मी फुल्यांचं नाव घेतो असं पवार म्हणाले.

शाहू महाराजांच नाव घेतो कारण....

पवार म्हणाले की, मी शाहू महाराजांच नाव घेतो, कारण शाहू राजे हे शेतकऱ्यांच्या घरात जाऊन जेवण करायचे. त्यांच्या समस्या ऐकायचे, शाहू महाराजांना खोटं बोललेलं आवडायचं नाही. काही सरदार शाहूंना भेटले आणि कर्नाटकातून ज्योतिष येणार आहे असं म्हणाले. तेव्हा शाहू म्हणाले माझा यावर विश्वास नाही मी भेटणार नाही. पण आग्रहावरून शाहू भेटले, ज्योतिष रडायला लागले. म्हणाले तुमच्या पोलिसांनी मला पकडलं, मारलं, दोन दिवस जेवायला दिलं नाही. त्यावर शाहू महाराज म्हणाले तू ज्योतिष आहेस मग तुला हे चार दिवस आधी कळलं नाही का? असं पवारांनी सांगितलं.

बाबासाहेब आंबेडकर यांना मानायचं कारण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानायचं कारण म्हणजे, सध्या आपल्या आसपास आणि इतरत्र अनेक देश अस्वस्थ आहेत तिथली कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आहे. आपल्या देशात अनेक आंदोलन झाली पण आपला देश आजही अबाधित आहे. हे त्यांचं योगदान आहे. स्वतंत्र मिळायच्या पूर्वी एक सरकार बनले, यात बाबासाहेब यांच्यासह अनेक नेते होते. त्यावेळी बाबासाहेब यांच्याकडून जलसंधारण, कामगार वीज हे खातं त्यांच्याकडे होतं. स्वातंत्र्याआधी धरणं बांधण्याचं निर्णय बाबासाहेबांनी घेतला.

भाक्रा-नांगल प्रकल्प उभारण्याचा निर्णय बाबासाहेब यांनी घेतला त्यामुळे त्या भागात आज 90 टक्के सिंचन आहे. दामोदर व्हॅली हा प्रकल्प बाबासाहेब यांनी मंजूर केला. आज वीज संकट आहे, बाबासाहेब यांनी निर्णय घेतला एखाद्या राज्यात जास्त वीज आणि एखादा राज्यात कमी वीज असेल तर ती वीज या राज्यातून त्या राज्यात नेण्यासाठी पवार ग्रीड योजना ही बाबासाहेब यांनी आणली. असंही पवापर म्हणाले आहेत.

१२ एप्रिलला ठाण्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उत्तर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT