एजंटमार्फत कोर्टात लग्न; अहमदाबादेतील नववधु पसार

एजंटमार्फत कोर्टात लग्न; अहमदाबादेतील नववधु पसार
Fraud Marriage
Fraud MarriageSaam tv
Published On

कुसुंबा (धुळे) : सुरत येथील पाटील कुटुंबास एजंटमार्फत लग्न जुळवलेले चांगलेच महागात पडले आहे. सोमवारी (ता.२५) सुरतमधील हरीकृष्णा मंदिरावर लग्न लागल्यानंतर कुसुंब्यांमार्गे हिंदासनी देवीवर कुलदैवतेचे दर्शन घेण्यासाठी जात होते, मात्र कुसुंबा (ता. धुळे) बसस्टँडजवळील एका हॉटेलवर गाडी थांबविली असता त्याठिकाणाहून नववधू पाटील कुटुंबास चकवा देत पसार झाली. पसार नववधूचे माहेर अहमदाबाद (Ahmedabad) येथील आहे. (dhule Marriage in court through an agent Newlyweds pass in Ahmedabad)

Fraud Marriage
हृदयस्पर्शी! हिंदू मित्राच्या मुलीचे मुस्लिम दाम्पत्याने केले कन्यादान

सुरत (कडोदरा चाररस्ता) येथील पाटील कुटुंबाने मंदिरात लग्न (Marriage) लागल्यानंतर कोर्टांत रजिस्टर नोंदणी केली. परंपरेनुसार कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी जात असताना कुसुंबा बसस्टँडजवळील रवींद्र रेस्टॉरंटवर अल्पोपहारासाठी गाडी थांबविली. नववधूने रेस्टाँरटंवर मला झोप लागल असून, मी गाडीत जाऊन झोपते असे सांगितले.

गाडीजवळ आल्‍यानंतर बसला धक्‍का

नातेवाईकांनीही तिला गाडीत जाण्यास सांगितले. परंतु काही वेळानंतर पाटील कुटुंब गाडीजवळ आले असता नववधू गाडीत दिसली नाही. पाटील कुटुंबाने शोध घेतला असता नववधू मिळून आली नाही. यानंतर पाटील कुटुंबाने धुळे तालुका पोलिस (Police) ठाणे गाठत सर्व प्रकार कथित केला. मुलाच्या आईला विचारले असता सदर विवाह एजंटमार्फत दोन लाख रूपये देऊन झाला आहे. एक लाख लग्नाला खर्च आला व तिच्याजवळ एक लाख रुपये दिले होते. अंगावर एक तोळा सोने, पायात पैंजनही घेऊन दिल्या होत्या. हे सर्व घेऊन नववधू पसार झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com