Sharad Pawar on Arvind Kejriwal  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar on Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना अटक झाली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

प्रविण वाकचौरे

Sharad Pawar News :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. स्वत: अरविंद केजरीवाल यांनी ही गोष्ट बोलून दाखवली आहे. ईडीकडून वारंवार समन्स बजावून देखील केजरीवाल चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.

विरोधकांना घाबरवण्यासाठी केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा अंदाजही शरद पवार यांनी वर्तवला. शिर्डी येथील मेळाव्यात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत जनतेने केजरीवाल यांना मतदान करुन सत्तेवर पाठवले आहे. मात्र त्यानंतर आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठीही पावले उचलली जात असल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय.

अरविंद केजरीवाल यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. केजरीवाल स्वच्छ प्रतिमेचे आहेत हे दिल्लीतील सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यांना अटक झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

केंद्र सरकारच्या कारवाईचा अर्थ असा आहे की, ज्यांचे राजकीय विचार भिन्न आहेत त्यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग करुन कारवाई करत दूर करण्याच प्रयत्न केला जात आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT