Sharad Pawar addresses concerns over ideological shifts within the Warkari sect, sparking political reactions across Maharashtra. Saam tv
महाराष्ट्र

पुरोगामी वारकरी प्रतिगामी झाले, शरद पवारांचा धर्मांधांना टोला

वारकरी संप्रदायासंदर्भात शरद पवारांनी केलेलं एक विधान चांगलचं चर्चेत आलयं... धर्मांधांना टोला लगावत वारकरी संप्रदायातील प्रतिगाम्य़ांच्या घुसखोरीवर पवार नेमकं काय म्हणाले...? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

महाराष्ट्राचा आत्मा असलेला वारकरी संप्रदाय... समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय आता पुन्हा चर्चेत आलाय..याला निमित्त ठरलयं...शरद पवारांनी केलेलं एक विधान...वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीत प्रतिगामी लोक घुसखोरी केल्याचं विधान शरद पवारांनी केलयं... पवार नेमकं काय म्हणाले बघा...

शरद पवार काय म्हणाले?

वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारण 40% लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाहीत

एकीकडे या वक्तव्याला विरोध होत असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी मात्र पवारांच्या विधानाची पाठराखण केलीय. इतकचं काय तर महायुतीतील मंत्री छगन भुजबळांनीही पवारांच्या विधानाचं समर्थन केलयं...

वारकरी संप्रदाय म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कणा . वारकरी संप्रदायात पुरोगामी विचारांची कास धरलेल्या संतांनी प्रचलित व्यवस्थेचे वेळोवेळी वाभाडे काढले होते. समतेच्या आणि बंधुतेच्या धाग्यांनी त्यांनी हा समाज बांधून ठेवला होता. मात्र काळाच्या महिम्यात हळूहळू या संप्रदायात बदल होत गेले. अर्थातच हे बदल मोठ्या प्रमाणात पुरोगामी विचारांना छेद देणारे होते. शरद पवारांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वारकरी संप्रदायातील या मुख्य विचारांनाच छेद देणाऱ्या प्रतिगाम्यांची घुसखोरी अधोऱेखित झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे ती या वारकरी संप्रदायाच्या मुळाचा शोध घेण्याची..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑपरेशन टायगरच्या चर्चांनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; खासदार सावंतांना मातोश्रीवरून आदेश, नेमकं काय घडलं?

चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग अध्यक्षपदी कोण? प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या महिला नेत्यानं व्यक्त केली इच्छा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये कोळशेवाडी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरटा जेरबंद, १० मोटरसायकली जप्त

प्रादेशिक पक्षाला मोठा झटका! प्रदेशाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

'शरद पवार धर्म मानत नाहीत', मुख्यमंत्री फडणवीसांची टीका; वारकरी संप्रदायावरील भाष्यामुळे राजकीय वातावरण तापलं!

SCROLL FOR NEXT