Sharad Pawar Ajit pawar Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News : अजित पवारांची राष्ट्रवादी प्रदेशाध्यपदी काम करण्याची इच्छा पूर्ण होणार? शरद पवार म्हणाले...

Political News : राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख नेमणुकांचा निर्णय मी एकटा घेत नाही.

मंगेश कचरे

Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख नेमणुकांचा निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांनी (अजित पवार) तशी इच्छा व्यक्त केली असेल तर त्यांच्यासोबत पक्षातील प्रमुख लोक बसतील. सर्वांमध्ये चर्चा होईल आणि त्या संबंधीचा निर्णय घेतील.

पक्षात संघटनेच्या कामात सर्वांनी लक्ष द्यावं अशी प्रत्येकाची भावना आहे. तेच मत त्यांनी त्याठिकाणी व्यक्त केलं आहे. त्यापेक्षा वेगळ काही नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं. . (Maharashtra Politics)

पाटना येथील बैठकीत काय झालं?

पाटना येथे पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीबाबत शरद पवार म्हणाले की, बैठकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत कोणतीही चर्चा देखील झालेली नाही. बैठकीत देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि देशातील काही भागात सांप्रदायिक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करुन समाजात तेढ कशी निर्माण होईल याचा प्रयत्न सुरु आहे, याबाबत चर्चा झाली.

जाती, धर्म यातून मतभेत वाढत असतील तर ते समाजाच्या दृष्टीने चांगले नाहीत, असंही शरद पवार यांनी म्हटलं. या सर्व गोष्टीवर आवर घालण्यासाठी एकत्र यावं, हा या बैठकीतील चर्चेचा विषय होता.

कांद्यातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न

पश्चिम महाराष्ट्रात कांद्याचं उत्पादन जास्त आहे. आता हैदराबादला हा कांदा विक्रीसाठी नेला जात आहे. मात्र तेथे अनेक शेतकऱ्यांची फजिती झाल्याचीही माहिती आहे. मात्र राजकीयदृष्ट्या फायदा घेण्याचं हे काम सुरु आहे, असा टोला शरद पवारांनी केसीआर सरकारला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT