NCP Leader SaamTV News
महाराष्ट्र

NCP: अजित पवारांचा शरद पवारांना झटका; उत्तर महाराष्ट्रातील बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घड्याळ बांधलं

Nanded Politics: नांदेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून, तालुकाध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. आगामी निवडणुकांपूर्वी ही मोठी राजकीय उलथापालथ ठरतेय.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. प्रत्येक पक्षाने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. अशातच नांदेडमध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तालुकाध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे नांदेडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

नांदेड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, देगलूर तालुकाअक्ष्यक्षांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली. या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

देगलूर तालुका अध्यक्ष ऍड अंकुश देसाई ,तालुका महिला अध्यक्षा तारकेश्वरी पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाचा राजीनामा देत अजित पवार गटात प्रवेश केला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना चिखलीकर यांनी विश्वास व्यक्त केला की, आगामी काळात अजूनही अनेक ज्येष्ठ नेते अजित पवार गटात सामील होतील. तसेच, नांदेड जिल्हा पूर्णपणे राष्ट्रवादीमय होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्या बाप बेटाच्या जोडीला अटक

GST नोंदणी आणखी सोपी होणार,फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार

Salt Remedies: आयुष्यात समस्या? तर मीठाशी संबधित 'हे' उपाय कराच, भाग्य उजळेल

Satish Shah Last Post : तुम्ही नेहमी...; विनोदी अभिनेते सतीश शाह यांची शेवटची पोस्ट व्हायरल

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT