Nagpur Police arrest Sharad Maind, NCP (Sharad Pawar faction) leader, in contractor suicide case. Saam TV Marathi News
महाराष्ट्र

नागपूरमध्ये कंत्राटदाराची आत्महत्या, शरद पवारांच्या नेत्याला ठोकल्या बेड्या, विदर्भाच्या राजकारणात खळबळ!

P.V. Verma contractor suicide Nagpur : नागपूरमधील कंत्राटदार पी.व्ही. वर्मा आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते शरद मैंद यांना पोलिसांनी अटक केली असून विदर्भाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

  • नागपूरमध्ये कंत्राटदार पी.व्ही. वर्मा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • या प्रकरणी शरद पवार गटाचे नेते शरद मैंद व मंजीत वाडे यांना अटक.

  • वर्मा यांनी मोठे कर्ज घेतले होते, सावकारी व थकीत बिले यामुळे आत्महत्या केली.

  • विदर्भातील राजकारणात या घटनेनंतर मोठी खळबळ माजली आहे.

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur contractor suicide case latest update : नागपूरमधील कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील यवतमाळ मधील नेत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर विदर्भात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या नेत्याचे नाव शरद मैंद असे आहे. मैंद यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा ऊर्फ मुन्ना वर्मा (६१) यांच्या आत्महत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यामधील एक आरोपी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद मैंद असे आहे. या घटनेनंतर विदर्भाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

वर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी शरद मैंद या आरोपीला यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमधून अटक केली. मैंद हे पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेशी संबंधित आहेत. त्याशिवाय ते यवतमाळमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेही आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूकसुद्धा लढवली होती, अशी माहिती समोर आली.

शरद मैंद यांच्याशी संबंधित पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतून वर्मा यांनी मोठे कर्ज घेतले होते. तर याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव मंजित वाडे असे आहे. मंजीत वाडे हा अवैध सावकारी करत होता. त्याने वर्मा यांना मोठ्या व्याजावर कर्ज देऊन वसुलीसाठी तगादा लगावला होता. ६१ वर्षीय वर्मा यांनी १ सप्टेंबर रोजी सकाळी नागपूर येथील राजनगर परिसरात त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विविध कंत्राटी कामांचे त्यांचे कोट्यवधी रुपयांचे बिल सरकार थकल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे तेव्हा समोर आले होते. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडजून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

Home Vastu: घरात देवघर करताना 'या' चुका टाळा, अन्यथा घरात येऊ शकेल संकट

Tanya Mittal: '१ रुपयांचं माचिस ६५ रुपयांना विकून झाले करोडपती...'; स्वतःच्या प्रेमात आंधळी तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली

Solapur : सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना;खरीप पिके जलमय | VIDEO

SCROLL FOR NEXT