sharad pawar ncp  Saam tv
महाराष्ट्र

महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांची मोठी खेळी; सुप्रिया सुळे, रोहित पवारांना दिली महत्वाची जबाबदारी

sharad pawar ncp : महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांची मोठा डाव टाकला आहे. निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह इतर नेत्यांना महत्वाची जबाबदारी दिली आहे.

Vishal Gangurde

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणुकींसाठी कसली कंबर

राष्ट्रवादीकडून निवडणुकींसाठी महत्वाच्या नेत्यांवर जबाबदारी

राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारींची यादी जाहीर

मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार कंबर कसली आहे. काही महापालिका क्षेत्रात राजकीय पक्षांशी युतीची चर्ता सुरू असताना राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवली आहे. मुंबईची जबाबदारी रोहित पवार तर पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादीने २९ महानगरपालिका निवडणूक प्रभारींची यादीच जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका निवडणुकींच्या तोंडावर नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. २९ महानगरपालिकेत निवडणूक प्रभारींची नेमणूक केली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

निवडणूक प्रभारींची यादी

बृहन्मुंबई - आमदार रोहितदादा पवार

ठाणे - आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड

नवी मुंबई - आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश अध्यक्ष

उल्हासनगर - आमदार .डॉ. जितेंद्र आव्हाड

कल्याण डोंबिवली - खासदार बाळयामामा म्हात्रे

भिवंडी निजामपूर - . खासदार बाळयामामा म्हात्रे

मीरा भाईंदर - आमदार .डॉ. जितेंद्र आव्हाड

नाशिक - सुनिल भुसारा

मालेगाव - खासदार भास्कर भगरे

अहिल्यानगर - खासदार निलेश लंके

जळगाव - संतोष चौधरी

धुळे - प्राजक्त तनपुरे

पुणे - खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा

पिंपरी चिंचवड - खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार

सोलापूर - खासदार धैर्यशील पाटील

कोल्हापूर - हर्षवर्धन पाटील

इचलकरंजी - बाळासाहेब पाटील

सांगली - मिरज - कुपवाड - आमदार जयंत पाटील

छत्रपती संभाजीनगर - खासदार बजरंग सोनवणे

नांदेड-वाघाळा - जयप्रकाश दांडेगावकर

परभणी - फौजिया खान

जालना - राजेश टोपे

लातूर - विनायक जाधव पाटील

अमरावती - रमेश बंग

अकोला - डॉ. राजेंद्र शिंगणे

नागपूर - अनिल देशमुख

चंद्रपूर - खासदार अमर काळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सनं केलं कॅप्टन

Wednesday Horoscope : शांतपणे आपला पल्ला गाठाल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडणार

पुणे-बेंगळुरू माaर्गावर बसवर दरोडा, बसमधील दरोड्याचा कट कुठे शिजला? हादरवणाारी माहिती समोर

Maharashtra Live News Update: निष्ठावंताना न्याय द्या, पुण्यात शिवसैनिक आक्रमक

Tragic Incident: शेकोटीनं घेतला जीव; हॉटेलच्या रुममध्ये ५ जणांचा गुदमरुन मृत्यू

SCROLL FOR NEXT