Sharad Pawar
Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Resignation : '5 मे रोजी समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल', राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Priya More

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना मोठा धक्का बसला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी हे सर्वजण करत आहेत.

शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत आहेत. कार्यकर्ते भावुक झाल्यानंतर शरद पवारांनी आपल्या निर्णयावर विचार करेल असे सांगितले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी 5 मे रोजी बैठक घ्यावी. या बैठकीमध्ये समिती जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल.' असं शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवारांनी पुढे सांगितले की, 'मी पक्षाच्या वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं असं मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण 6 मे रोजीची बैठक 5 मे रोजीच घ्या. या बैठकित समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.'

दरम्यान, शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावुक झाले. त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांन पडला. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत होते. त्यानंतर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी एक समिती नेमण्यात आली.

या समितीची बैठक ही 6 मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांनी सूचना दिल्यामुळे ही बैठक 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांचा राजीनामा मान्य केला जाणार की नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात येणार याचा निर्णय येत्या दोन दिवसांत समोर येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nailgrowth Effects: तुमची नखं झपाट्याने वाढतायेत? आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा!

T20I Records: विराट,धोनी नव्हे, तर या रेकॉर्डमध्ये रोहितच नंबर १

Today's Marathi News Live : संजय राऊत उद्या नाशिक दौऱ्यावर, राजाभाऊ वाजेंसाठी घेणार सभा

Pune Rain Update : ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसानं झोडपलं; उकाड्याने हैराण झालेल्यांना मिळाला दिलासा

Sanjay Raut: ब्रेंकिंग! PM मोदींबाबत वादग्रस्त विधान, संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल; भाजप नेत्यांकडून अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT