Sharad Pawar News SaamTv
महाराष्ट्र

Sharad Pawar : 'आम्ही सत्तेत नसलो तर...'; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया

Sharad Pawar News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या पराभवावर भाष्य केलं.

Vishal Gangurde

सातारा : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. राज्यात महायुतीला २३० जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला ५० चा आकडाही पार करता आला नाही. महाविकास आघाडीच्या मोठ्या पराभवानंतर शरद पवार यांनी आज रविवारी साताऱ्यात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या खोट्या प्रचाराचा फटका बसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पत्रकार परिषदेत भाष्य केलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवार म्हणाले, ' हा लोकांनी निर्णय दिला आहे. आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय दिला आहे. असा अनुभव आम्हाला कधी आला नाही. मात्र आता याचा अभ्यास करावा लागणार आहे. आम्ही पुन्हा एकदा कामाला लागू. मी याबाबत काही बोलू इच्छित नाही. या निकालानंतर आम्ही त्याची कारणमिमांसा करू. त्यानंतर पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करू. मी निवृत्त व्हावं की नाही, हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. दुसऱ्यांनी कशाला सांगायला पाहिजे.

लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही रक्कम महिलांना दिली. आम्ही सत्तेत नसलो तर हे पैसे बंद होतील असा प्रचार करण्यात आला. त्यामुळे कदाचित महिलांनी मत महायुतीला दिलं असेल. सत्ताधाऱ्यांच्या या प्रचाराचा आम्हाला फटका बसला. कटेंगे तो बटेंगे या नाऱ्याचाही परिणाम झाला'.

'लोकसभेला जो नागरिकांनी निर्णय घेतला. त्यामुळे आमच्यात अधिकचा विश्वास होता. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी काम केलं. कोण मागं राहिलं नाही. ईव्हीएमबद्दल मला आताच काही सांगता येणार नाही. पैशांचा वापर आतापर्यंत असा कधी पाहायला मिळाला नव्हता, असेही शरद पवार म्हणाले.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'ओबीसी समाजाच्या मंडल आयोगाचा निर्णय माझा आहे. आम्ही आरक्षणाच्या बाबतीत देखील निर्णय घेतला होता. ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेतला होता. त्याचा अध्यक्ष मी होतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

Eknath Shinde : राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

Maharashtra News Live Updates: अंबरनाथमध्ये एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT