Sharad Pawar news Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : वाटेल ती किंमत मोजू, पण...; सामाजिक ऐक्यावर शरद पवारांचं नाशकात महत्वाचं विधान

Sharad Pawar News : शरद पवार यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात पवारांनी सामाजिक ऐक्यावर भाष्य केलं.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दोन्ही गटातील लोकांकडून तीव्र आंदोलन पाहायला मिळत आहे. आरक्षणावरील राजकारणामुळे राज्यातील राजकारण ढवळून गेलं आहे. आरक्षणाच्या वादावरून राज्यातील सामाजिक ऐक्याला तडा जात असल्याचे बोलले जात आहे. या वादादरम्यान खासदार शरद पवार यांनी नाशिकमध्ये सामाजिक ऐक्यावर मोठं भाष्य केलं आहे. वाटेल ती किंमत मोजू पण सामाजिक ऐक्य जपू, असं महत्वाचं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवार हे आजपासून ४ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील आंबे दिंडोरीत दिवंगत दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला.

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे

आज अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. दादासाहेब हे समाजकारण आणि राजकारणातील व्यक्तिमत्त्व. दादासाहेब गायकवाड यांचे जीवन गंमतीचा कालखंड आहे. ते संसदेत गेले, व्यक्तिगत जीवनात ते पोस्टात कारकून होते. पाकिस्तान झालेले नव्हते. हिंदुस्थान अखंड होते. तेव्हा कराचीत नोकरीला होते. नोकरी सोडून आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत भेट झाली. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना हेरलं. हे गृहस्थ साथ देतील, असे वाटल्यावर सूतोवाच केला.

दादासाहेब यांना आंबेडकर यांनी प्रोत्साहन दिलं. नोकरी सोडून समाजकारण आणि राजकारण करायचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पक्ष काढला होता. दादासाहेब गायकवाड यांनी त्या पक्षातून उभे राहिले होते. दादासाहेब तेव्हा निवडून आले होते.

तेव्हाचा काळ वेगळा होता. संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता. त्या चळवळीमध्ये नाशिकचा वाटा आहे. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी, नेहरूंना पटवून दिले. नंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. नेतृत्व यशवंतराव चव्हाण करत होते.

तेव्हाच देशावर संकट आले. चीनने आक्रमण केले. त्यावेळेस अस्वस्थता निर्माण झाली होती. चीनचे आक्रमण झाले. तेव्हा संरक्षण खात्याची जबाबदारी व्यवस्थित पाळली गेली नाही म्हणून तेव्हाच्या संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. यशवंतराव मुख्यमंत्री होते, तेंव्हा त्यांना नेहरूंनी बोलावून घेतले. सैन्यदलाचे मनोबल खचले होते, तेव्हा चव्हाण साहेबांनी जबाबदारी घेतली होती. देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब होती. जबाबदारी घेतली. तेव्हा चीनने सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली होती.

१९५७ संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर ६२ ला लोकसभेचे सदस्य झाले. दिल्लीला जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा कुठून जायचा प्रश्न आला. गोविंदराव देशपांडे यांची जागा खाली झाली. बिनविरोध चव्हाण साहेबांना नाशिकने निवडून दिले हा इतिहास आहे. दादासाहेबांना राज्यसभेत यावे, अशी इच्छा होती. कमी घटकातील व्यक्तीला पुढे आणायचे ठरले. दादासाहेब यांच्या निमित्ताने काँग्रेससोबत आरपीआयची पहिल्यांदा युती झाली.

सामाजिक ऐक्य जपण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न केले. त्याचे श्रेय यशवंतराव चव्हाणांनी दादासाहेब गायकवाड यांना द्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे नेतृत्व भूषण भूषण गवई करतात. रासू गवई महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेस आणि आरपीआयच्या माध्यमातून सदस्य होते. सदस्यच नाहीतर अध्यक्ष झाले. राज्यपाल सुद्धा झाले. काँग्रेस आणि आरपीआयच्या युतीचा पाया दादासाहेब गायकवाड यांनी भरला होता. जिथं जिथं परिवर्तन आजी संघर्ष आला, तिथं दादासाहेब गायकवाड अग्रभागी राहिले.

सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेशामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. माझा फार त्यांच्याशी संबंध आला नाही. मी पहिल्यांदा निवडून गेलो, तेव्हा ज्येष्ठ लोकांवर आमची मात्र दृष्टी असायची. त्यात दादासाहेब गायकवाड यांचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल. एक सोहळा झाला होता. कुसुमाग्रज, शांताबाई, पोतनीस, पाटील यांनी जिल्ह्याच्या वतीने ६१ चा कार्यक्रम केला होता. तो कार्यक्रम महाराष्ट्रात गाजला. नंतर ६८ साली पद्मश्री देऊन त्यांचा सरकारने गौरव केला. मला आज आनंद आहे, पण महाराष्ट्राचे चित्र वेगळं झालं आहे.

सामाजिक ऐक्याची वीण उसवते का ? असे वाटते आहे. माझ्या मते हे मोठे आव्हान आहे ? वाटेल ती किंमत मोजू, पण सामाजिक ऐक्य जपू. सामाजिक ऐक्य जपलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी पुढे यायला पाहिजे. दादासाहेब गायकवाड हे माझ्या चरित्राचा अर्धा भाग असतील, असे आंबेडकर यांनी भावना व्यक्त केली होती. यामध्ये दादासाहेब यांची किती मोठी उंची होती हे महत्त्वाचे आहे. आज दादासाहेब यांचा विचार जाणून घेतले. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य जपूया असे आवाहन करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT