लक्ष्मण हाकेंच्या लग्नाच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक; जिथे दिसेल तिथे ठोकू, मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा इशारा

OBC Reservation update : लक्ष्मण हाके यांच्या लग्नासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांनी हाके यांना इशारा दिला आहे.
OBC Reservation update
OBC Reservation update Saam tv
Published On
Summary

लक्ष्मण हाके यांच्या आंतरजातीय विवाहाच्या वक्तव्यावरून मराठा समाजात संतापाची लाट

मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांना इशारा दिला

लक्ष्मण हाके यांच्या विधानाने नवा वाद होण्याची शक्यता

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड: मराठांच्या ११ मुलींचा विवाह ओबीसींसोबत लावा, असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याचा निषेध मराठा समाजातून केला जात आहे. लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याचा समाचार मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनीही घेतला. लक्ष्मण हाके यांना जिथे दिसेल तिथे ठोकू, असा शब्दात मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी इशारा दिला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयक जीआरमुळे ओबीसी समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. याच आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला विवाहाचा प्रस्ताव दिला. याच प्रस्तावावरून मराठा समाजातील आंदोलकांकडून लक्ष्मण हाके यांना लक्ष्य केलं जात आहे. गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं की, 'हाके यांनी काय मॅरेज ब्युरो सुरू केला आहे का? असे काही वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं'.

OBC Reservation update
Terrorist Attack : लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला; १२ जवानांचा मृत्यू, पाकिस्तानात खळबळ

'हाके यांनी अभ्यास करावा. आरक्षण मिळलं. ओबीसीत आरक्षण भेटले म्हणजे लगेच आंतरजातीय विवाह करावा, असं कुठे काही लिहिलेलं नाही. ओबीसीमध्ये साडेतीनशे जाती आहेत. त्यांच्यामध्ये आणखी काही आंतरजातीय विवाह झालेले नाहीत, पण त्यांच्यामध्ये जर आंतरजातीय विवाह होत असतील, तर आम्ही देखील करायला तयार आहोत. लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त प्रश्न उपस्थित करू नयेत. लक्ष्मण हाके दिसतील, तिथे ठोकू. रस्त्यावर टोकाचा संघर्ष होईल. लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबद्दल खालच्या भाषेत बोलू नये, असं गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं आहे.

OBC Reservation update
Supreme court : सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका; राजकीय पक्षांच्या नोंदणीवरून घेतला महत्वाचा निर्णय

'लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय की, त्यांच्यावर जात चोरण्याची वेळ आली आहे. यावर काळकुटे म्हणाले की, मराठा समाजाची ही आरक्षणाची लढाई आहे. ओबीसीमधील 50% च्या आतमधील जे आमच्या हक्कांचं आरक्षण आहे. 1994 साली शरद पवारांनी मराठा समाजासह येथे जातींना आरक्षण लागू केले हे आम्ही मिळवलं आहे. आमचं आरक्षण आम्हाला मिळावं म्हणून आमचा हा लढा आहे. आम्ही कुठेही जात चोरीचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी थोडं तोंड सांभाळून बोलावं,असे ते पुढे म्हणाले.

OBC Reservation update
Election : यंदा गुलाल कुणाचा? पंचायत समिती सभापती, उपसभापतीचे आरक्षण जाहीर, वाचा यादी

पंकजा मुंडे यांच्या मागणीवर बोलताना काळकुटे म्हणाले, 'चुकीच्या नोंदणी निघत असेल तर चौकशी करा. मात्र आम्हाला पंकजा मुंडे यांना सांगायचं आहे की, मराठे तर ओबीसीमध्ये आलेच आहेत. सरकार तुमचं आहे. चौकशी करा. अधिकारी बोगस प्रमाणपत्र देणार नाहीत. मराठा समाजाबद्दल वेळोवेळी पंकजा मुंडे या वेगळी भूमिका घेत आहेत. त्यांनी भूमिकेमध्ये बदल केला पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत असताना त्यांनी विरोध करूनही त्या आमच्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत, असेही काळकुटे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com