विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून शरद पवारांनी महायुतीवर हल्लाबोल केला होता. शरद पवारांच्या या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. विधानसभेत मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून शरद पवार आणि फडणवीसांमध्ये जुंपली आहे. आपल्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांसमोर थेट लोकसभेच्या निकालाचा हिशोब मांडलाय.
कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी विधानसभेतील निकालात घोळ झाल्याचा आरोप केला होता. मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत. कमी मते मिळाल्यानंतरही शिंदे गट, आणि अजित पवार यांची सर्वाधिक उमेदवार निवडून आली असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. राज्यात काँग्रेसला ८० लाख मते आहेत आणि काँग्रेसचे १५ उमेदवार निवडणून आलीत.
तर शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, म्हणजेच काँग्रेसपेक्षा एक लाख मते कमी पडली आहेत. तरीही त्यांचे ५७ उमेदवार निवडणून आलेत. तर शरद पवार गटाला ७२ लाख मते असून आमचे १० उमेदवार निवडून आले. त्याचबाजुला अजित पवार गटाला ५८ लाख मते आहेत त्यांचे ४१ उमेदवार निवडून आलेत.
शरद पवारांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांना उत्तर दिलंय. यावेळी फडणवीसांनी थेट लोकसभा निकालाची आकडेवारी मांडलीय. तसेच त्यांनी शरद पवार यांना जनतेची दिशाभूल करून नये, असा सल्लाही दिलाय. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल, असा टोमणाही त्यांनी शरद पवारांना त्यांनी लगावलाय.
चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू,
भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13.
शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. तर 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.