Sharad Pawar And Ajit Pawar Meeting  Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar-Ajit Pawar: काका-पुतण्याची वारंवार भेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

Maharashtra Politics: 2023 मध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला गेला होता. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पवार कुटुंब आमने-सामने आलं होतं. मात्र पवार काका- पुतण्यांमध्ये भेटीगाठी वाढल्याने दोघेही एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलीय.. या जवळिकीचे कारण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मस्कर, साम प्रतिनिधी

पुण्यात सोमवारी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अर्धा तास खलबतं झाली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता पवार काका- पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलीय. पुण्यातील सारसण संकुतात 'कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बैठकीला कृषीमंत्र्यांसह अजित पवार आणि शरद पवारही उपस्थित राहिले.

गेल्या काही दिवसांतील अजित पवार आणि शरद पवारांची ही चौथी भेट होती. त्यामुळे त्यामुळे काका-पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलायं. अजित पवारांनी जरी कौटुबिक कारणाने भेटीगाठी घेत असल्याचं सांगितलं असलं तरी विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्यात. त्या कशा पाहूयात.

काका-पुतण्या भेटी-गाठी

12 डिसेंबर 2024

वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट

23 जानेवारी 2025

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा

27 जानेवारी 2025

तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांचा शरद पवारांना फोन

22 मार्च 2025

अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र

10 एप्रिल 2025

जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र

12 एप्रिल 2025

रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातही शरद पवार आणि अजित पवार एकत्र

21 एप्रिल 2025

पुण्यात 'कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर आयोजित बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र

राष्ट्रवादीच्या फुटीला आता दीड वर्ष झालयं. पण अजित पवारांच्या मनातून शरद पवारांवरचं प्रेम काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे अजित पवारांनी जुन्या वादाला भावनिक किनार दिलीय का? असा प्रश्न निर्माण झालाय. आता दादांचे हे वक्तव्य ऐका. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठींबद्दल आता महाविकास आघाडीमध्येही प्रतिक्रीया उमटतायेत. शिंदेंसोबत आम्हाला कधी पाहिले का? असा सवाल करुन राऊतांना नेमकं काय सुचवायचं होतं? असा प्रश्न निर्माण झालायं.

अजित पवार आणि शरद पवारांचे वाद हे फक्त वरवरचे होते का? एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय होणार? काका- पुतण्यांना एकत्र आणण्यास कुणाची भूमिका महत्त्वाची असेल? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT