महाराष्ट्र

Sharad Mohol Case: स्वाती मोहोळ धमकी प्रकरणी मोठी अपडेट; ससून रुग्णालयातून आरोपी फरार

Swati Mohol News: मुन्ना पोळेकर हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं जात आहे. ५ फेब्रुवारी रोजी शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Ruchika Jadhav

सचिन जाधव

Pune Crime News:

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येनंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणी दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशात आज शरद मोहोळच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. मार्शल लीलाकर असे ससूनमधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यात ५ जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाली. हत्येनंतर या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १६ जाणांना अटक केली आहे. मुन्ना पोळेकर हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. ५ फेब्रुवारी रोजी शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

ही धमकी मुन्ना पोळेकरच्या बनावट सोशल मीडिया अकाऊंटवरून देण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवून ९ जानेवारी रोजी धमकी प्रकरणी मार्शल लीलाकरला अटक केली. मार्शलला वैद्याकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांच्या हातावर तूरी देऊन त्याने तेथून पळ काढला आहे.

आरोपींना ७ दिवसांची मोक्का कोठडी

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपींना ७ दिवसांची मोक्का कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्या मोबाईलमधून महत्त्वपूर्ण ६ ऑडियो क्लिप पोलिसांना मिळाल्यात. त्यामार्फत आणखी माहिती हाती लागू शकते असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे आरोपींना ७ दिवसांची मोक्का कोठडी सुनावण्यात आलीये. या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार, मुन्ना पोळेकरसह इतर आरोपींना ७ दिवसांची मोक्का कोठडी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

White Hair Care: कमी वयातच केस पांढरे होऊ लागले? मग करा 'हा' घरगुती उपाय, महिन्याभरात दिसेल फरक

Maharashtra Politics : ठाकरेंना काँग्रेस नकोय की काँग्रेसलाच स्वबळावर लढायचंय? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

Thursday Horoscope: पैशाचं नियोजन करा अन्यथा...या राशींच्या व्यक्तींना बसणार आर्थिक फटका, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT