Rupali Thombre Criticizes Medha Kulkarni Saam TV
महाराष्ट्र

रूपाली ठोंबरेंकडून भाजप खासदारावर जहरी टीका; शनिवारवाड्यातील नमाज पठण प्रकरणामुळे नवा वाद उफाळला

Rupali Thombre Criticizes Medha Kulkarni: शनिवारवाड्यात नमाज पठणामुळे वादंग. रूपाली ठोंबरेंकडून मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.

Bhagyashree Kamble

  • शनिवारवाड्यात नमाज पठणामुळे वाद.

  • 'मेधा कुलकर्णी वैयक्तिक अजेंड्यावरून वागत आहेत'

  • 'मी हिंदू आहे, आम्हाला हिंदुत्व मेधा ताई यांनी शिकवू नये'

  • मेधा कुलकर्णी यांच्यावर रूपाली ठोंबरेंकडून टीका.

पुण्यातील शनिवारवाड्यात महिलांनी नमाज पठण केल्याच्या पार्श्वभूमीवर काल भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन छेडलं. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांनी सडेतोड टीका केली आहे. रूपाली ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार, 'मेधा कुलकर्णी वैयक्तिक अजेंड्यानुसार वागतात. त्यांना नौटंकी करण्याची सवय आहे. कुलकर्णी या भाजपाच्या असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी त्यांना थांबवायला हवंय. कारण त्या शिक्षिका आहेत. पण त्यांची डिग्री आता चेक करावी लागेल', असंही रूपाली ठोंबरे म्हणालेत.

रूपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. 'मेधा कुलकर्णी यांनी जे केलंय ते अशोभनीय आहे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत पण दोन समाजात तेढ निर्माण करणारे हिंदू नाहीत', असं रूपाली ठोंबरे म्हणाल्या. 'मेधा कुलकर्णी पर्सनल अजेंडा राबवतात', असाही हल्लाबोल यावेळी त्यांनी केला.

रूपाली ठोंबरे म्हणाल्या की, '१९३६ साली चित्रशाळेच्या पुरातन विभागात मजारची नोंद आहे. तसेच पेशव्यांनी शाहू महाराजांकडून परवानगी घेऊन ही जागा दिली होती. शनिवारवाडा ऐतिहासिक स्थळ आहे. बुरखा घातलेल्या महिलेनं नमाज केली. शेजारी हनुमान चालीसा पठण केली. तर, ती जागा कुणाच्या बापाची होते का?', असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

'लाजा वाटल्या पाहिजे पुण्यातील वातावरण तुम्ही (मेधा कुलकर्णी) खराब करत आहात. मेधा कुलकर्णी यांना नौटंकी करायची सवय आहे', असंही रूपाली ठोंबरे म्हणाल्या. 'शनिवार वाड्यात सगळ्या धर्माची लोकं येणार. पोलिसांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे', अशी मागणीही त्यांनी केला आहे.

'मी हिंदू आहे, आम्हाला हिंदुत्व मेधा ताई यांनी शिकवू नये. हिंदू धर्मातील लोकं महिलांवर अत्याचार करतात तेव्हा आपण पुढे येता का?', असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 'भाजपच्या नेत्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे. मेधा कुलकर्णी या शिक्षिका आहेत. पण त्यांची डिग्री आता चेक करावी लागेल', असंही रूपाली ठोंबरे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं? VIDEO

Navi Mumbai: उरण ते खारकोपरदरम्यान लोकलसेवा स्थगित, प्रवाशांचे हाल, नेमकं कारण काय?

Chennai News: बाईक थांबवली, पॅन्टची चेन काढली अन्...; पहाटे पाच वाजता महिलेसोबत घडलं भयंकर; VIDEO व्हायरल

Eye Dark Circle Remove Tips: डोळ्याखालची त्वचा काळी झालीये ? मग लगेचच करा हे ५ घरगुती उपाय

दहशतवादी पथकाची मोठी कारवाई; मुंब्र्यानंतर कुर्ल्यात छापेमारी, नेमकं काय सापडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT