shanishingnapur devsthan workers calls strike from 25 december saam tv
महाराष्ट्र

Shanishingnapur: शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा

नाताळाची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News :

शनिशिंगणापूर (shanishingnapur) मधील शनि देवस्थान मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या 25 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबतचे पत्र श्री शनेश्वर देवस्थान कामगार युनियनने देवस्थान प्रशासनाला दिले आहे. (Maharashtra News)

शनिशिंगणापूर देवस्थान मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी यापू्र्वी 12 सप्टेंबर आणि पाच डिसेंबरला देवस्थान प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत कामगारांच्या समस्यांबाबत तोडगा काढण्याची विनंती केली होती. मात्र अद्यापही देवस्थान प्रशासनाने तोडगा न काढल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

नाताळाची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थान मधील कर्मचारी संपावर गेले तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

अशा आहेत मागण्या

१. देवस्थानातील सर्व कामगार कर्मचारी यांचे अनुभव व शैक्षणीक पात्रतेनुसार हुदा

पदनिश्चिती करावी.

२. देवस्थानातील सर्व कामगार कर्मचारी यांना दि.०१/१०/२००३ च्या करारानुसार ५ वी वेतन श्रेणीनुसार २००३ ते २०२३ पर्यंतचा फरक अदा करून ७ वा वेतन आयोग मागील फरकासह त्वरीत लागु करावा.

३. देवस्थानात अनुकंपा तत्वावर वारसास सेवेत समाविष्ट करण्यात यावे.

४. देवस्थानातील सर्व कामगार कर्मचारी व त्यांच्या कुटुंबास वैदयकिय सेवा मोफत मिळावी.

५. देवस्थानात कोरोना आजाराने मयत झालेल्या कर्मचा-यांचे वारसास नुकसान भरपाई देऊन त्यांचे एका व्यक्तिस सेवेत घेण्यात यावे.

६. प्रोव्हिडंट फंड कायदयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

७. कर्मचा-याकडून जर काही गैरवर्तन घडल्यास किंवा आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यापुर्वी " चौकशी समितीमार्फत चौकशी करावी. त्या चौकशी समितीमध्ये युनियनचे २ संचालक, प्रतिनिधी असावे.

८. सेवा निवृत्तीचा कालावधी ५८ वरून ६० वय वर्षे करण्यात यावा. :

९. देवस्थानातील कामगार कर्मचारी यांना दिवाळी पुर्वी दरवर्षी २ महिन्याचा पगार बोनस किंवा सानुग्रह अनुदान बोनस म्हणुन देण्यात यावे.

१०. देवस्थानातील कामगार कर्मचारी यांचे कोरोना काळातील १८ महिन्याचा राहिलेला अर्धा पगार अदा करण्यात यावा.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT