मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil sabha in beed) यांच्या निर्णायक इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये धुळे - सोलापूर महामार्गासह (dhule solapur highway), बीड-परळी महामार्ग (beed parli highway) वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. येत्या 23 डिसेंबरला प्रवाशांनी सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत महामार्ग बंद राहणार असल्याची नाेंद घ्यावी. वाहनधारकांनी पर्यायी महामार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (nandkumar thakur) यांनी केले आहे. (Maharashtra News)
मनोज जरांगे पाटील यांची 23 डिसेंबरला बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर धुळे- सोलापूर महामार्गासह बीड-परळी या महामार्गावर 23 डिसेंबरला सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सभेची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने वगळून अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
असा आहे पर्यायी मार्ग
- छत्रपती संभाजीनगर- बीड- धाराशिव या मार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर, पैठण, खरवंडी, शिरूर, पाटोदा, धाराशिव किंवा छत्रपती संभाजी- नगर, गढी-माजलगाव, तेलगाव, धारूर, केज, मांजरसुंबा या पर्यायी मार्गाने करता येईल.
- धाराशिव- बीड- गेवराई- जालना या मार्गावरील वाहतूक धाराशिव, मांजरसुंबा केज, धारूर, तेलगाव, माजलगाव जालना या मार्गाने करता येईल.
- धाराशिव- बीड- छत्रपती संभाजीनगर या मार्गावरील वाहतूक धाराशिव, मांजरसुंबा, पाटोदा, खरवंडी, पैठण, संभाजीनगर किंवा मांजरसुबा, पाटोदा, शिरूर कासार, पाथर्डी, पैठण, छ. संभाजीनगर अशी राहील.
- जालना- बीड- अहमदनगर या महामार्गावरील वाहतूक जालना, गेवराई, मादळमोही या मार्गाने असेल.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
- माजलगाव- तेलगाव- बीड - धाराशिव या मार्गावरील वाहतूक माजलगाव, तेलगाव,धारूर, केज, मांजरसुंबा, धाराशिव अशी असेल.
- परळी तेलगाव- बीड या मार्गावरील वाहतूक परळी, तेलगाव, माजलगाव, बीड या मार्गाने होणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.