शनि शिंगणापुर Saam Tv
महाराष्ट्र

Shani Shingnapur: देवाला फसवाल, तर अडकाल! शनिदेवाला तेलाभिषेक करताना भेसळ आढळली तर फौजदारी कारवाई

Shani Shingnapur Temple: शनि शिंगणापुर देवस्थान समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Omkar Sonawane

सुशील थोरात,साम टीव्ही

अहिल्यानगर: महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात शनि शिंगणापुर हे देवस्थान आहे. शनि मंदिरामुळेच या गावाचे नाव शनि शिंगणापुर झाले असे सांगितले जाते.हे एक तीर्थक्षेत्र मानले जाते. या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात.राज्यातूनच नव्हे तर देशातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. शनि देवताला तेल हे प्रिय आहे. त्यामुळेच शनि देवाला तेल चढवले जाते. तसेच काही भक्तगण हे देवाला तेलाचा अभिषेक देखील घालतात. परंतु या मंदिराच्या समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय १ मार्चपासून समितीने लागू केला.

शनिशिंगणापुरच्या शनिदेवाच्या शिळेची झीज होत आहे. शनि देवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानच्या ट्रस्टने हा नियम लागू केला. शनि देवाच्या चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तेलाचा अभिषेक करण्याची परंपरा आहे. पण याच तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या शिळेची झीज होत असल्याचे देवस्थानाकडून सांगितले होते. ही झीज रोखण्यासाठी तेल अभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक केले आहेत. हा बदल १ मार्च २०२५ पासून लागू देखील करण्यात आला.

शनैश्वर देवस्थानच्या या निर्णयामुळे शनिशिंगणापुरात पहिल्याच दिवशी तब्बल ४० हजार भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले.

शनिशिंगणापुरात शनिवारपासूनच भाविकांकडून केवळ ब्रँडेड तेलच स्वीकारले जात आहे. यासाठी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून मुख्य प्रवेशद्वारावर तेलाच्या बाटल्यांची तपासणी केली जात आहे. देवस्थानने हा निर्णय घेतल्याने स्थानिक व्यावसायिकांनीही आपापल्या दुकानांमध्ये ब्रँडेड तेलाच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत.तसेच भाविकांच्या सोयीसाठी शनिदेवाच्या चौथऱ्याजवळ मोठ्या प्लास्टिक बॅरल्स ठेवण्यात आल्या आहेत, जिथे अभिषेकासाठी तेल टाकता येईल. तसेच, जर कोणत्याही तेलाच्या बाटलीवर संशय आल्यास त्याची त्वरित तपासणी करण्यात येणार आहे.

जर तेल भेसळयुक्त आढळले, तर संबंधित दुकानदारावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शनिशिंगणापूर प्रशासनाने दिली आहे. शनैश्वर देवस्थानचे ट्रस्टी आप्पासाहेब शेटे यांनी साम टीव्हीला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले भाविकांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, भेसळयुक्त तेलातील रसायनांमुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम होतो,त्यामुळे ब्रँडेड तेलाचा नियम योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिशिंगणापूर देवस्थानच्या या निर्णयामुळे शनिदेवाच्या शिळेचे संरक्षण होणार असून, यामुळे भाविकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी भावना येणाऱ्या भाविकांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT