Pandharpur News : आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन रांग राहणार सुरु

Pandharpur : आषाढी व कार्तिकी यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यामुळे पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी असते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न सुरु आहे
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन संवर्धनपनाचे काम करण्यात येत आहे. आगामी येणाऱ्या आषाढी यात्रेपूर्वी सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी टोकन दर्शन सुविधा देखील आषाढी यात्रेपूर्वी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

आषाढी व कार्तिकी यात्रेला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यामुळे पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी पाहण्यास मिळत असते. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम देखील सुरु आहे. या कामाला देखील गती देत आषाढी यात्रेपूर्वी करण्यात येणार असल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. 

Pandharpur News
ATM Card Fraud : फेविक्विक टाकून एटीएममधून काढायचे रक्कम; ग्राहकांची फसवणूक करणारा एकजण ताब्यात

ऑनलाईन दर्शन रांग देखील राहणार सुरु  

टोकन दर्शन सुरू करण्यासाठीची संगणक प्रणाली तयार झाली आहे. लवकरच सुरक्षेच्या दृष्टीने टोकन दर्शनाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर आषाढी यात्रेत टोकन दर्शन सुरू होणार आहे. टोकन दर्शन सुरू झाले तरी सामान्य भाविकांचे दर्शन रांग आणि ऑनलाइन दर्शन रांग देखील सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Pandharpur News
Water Crisis : सलग तीन वर्षापासून गावात पाणीटंचाई, योजनेचे काम अपूर्ण; संतप्त महिलांची पंचायत समितीवर धडक

केवळ टेंडर रद्द 
दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामासाठी १३० कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले होते. या कामाचे फक्त टेंडर रद्द झाले आहे. सरकारने दिलेला निधी रद्द झाला नाही. त्यामुळे राज्य सरकार विठ्ठल भक्तांना टोकन दर्शन देण्यासाठी बांधील असल्याचा दावा समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com