Shaktipeeth Expressway Saam Tv
महाराष्ट्र

Shaktipeeth Expressway: नागपूर ते गोवा फक्त ९ तासात पोहोचणार; १३ जिल्ह्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग; सिंधुदुर्गातील या गावांचा समावेश

Shaktipeeth Expressway Route From Nagpur to Goa: शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार आहे. हा महामार्ग सिंधुदुर्गातील या गावांमधून जाणार आहे. या गावांची यादी वाचा.

Siddhi Hande

शक्तीपीठ महामार्ग १३ जिल्ह्यातून जाणार

नागपूर ते गोवा फक्त ९ तासात

सिंधुदुर्गातील या गावांमधून जाणार

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला आता हिरवा कंदील मिळाला आहे. शक्तीपीठ महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जाणार हेदेखील ठरले आहे. आता राज्य सरकारकडून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बांधण्यासाठी पावले उचलली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गात बदल केला आहे.

शक्तीपीठ महामार्ग याआधी १२ जिल्ह्यांमधून जाणार होता. आता हा महामार्ग १३ जिल्ह्यांमधून जाणार आहे. यामध्ये साताऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार आहे.

या शक्तीपीठांना जोडणार

नवीन आराखड्यानुसार आता शक्तीपीठ महामार्ग वर्ध्यातूल पनार ते गोव्यातील पत्रादेवपर्यंत असणार आहे. या मार्गाला राज्य महामार्ग क्रमांक १०चा दर्जा देण्यात आला आहे. महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि रेणुका माता अशा तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार आहे.

या जिल्ह्यांमधून जाणार (Shaktipeeth Mahamarg Goes From 13 District)

हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, परभणी, बीड, लातूर, धाराशिवमधून जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातून जाणार आहे. तसेच सिंधुदुर्गातून जाऊन गोव्याच्या सीमेवर संपणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गावातून जाणार महामार्ग (Shaktipeeth Expressway Goes From Sindhudurg)

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील इसापूर येथून हा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. यानंतर दोडामार्ग तालुक्यात कुंभवडे, फुकेरी, झोळंबे या गावांमधून जाणार आहे. नंतर सावंतवाडी तालुक्यातील केगड, उडेली, नेने, फणसवडे, घाराप, दाभिळ, असनिये, पडवे माजगाव, पडवे, डेगवे आणि बांदा या गावांमधून जाणार आहे.

नागपूर ते गोवा फक्त ८ तासात (Nagpur to Goa in Just 8 Hours)

सध्या नागपूर ते गोवा प्रवासाला १८ ते २१ तास लागतात. शक्तीपीठ महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा वेळ ८ ते ९ तासांवर येणार आहे. तुम्ही नागपूर ते गोवा फक्त ८ तासात जाऊ शकतात. हा महामार्ग महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणाला जोडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT