kolhapur Crime News, Andhashraddha Nirmoolan Samiti SAAM DIGITAL
महाराष्ट्र

Andhashraddha Nirmoolan Samiti : करणीच्या बहाण्याने 60 हजार उकळणारा भोंदूबाबा शाहूपुरी पोलीसांची ताब्यात, अंनिसच्या प्रयत्नाला यश

काेल्हापूरातील मध्यवस्तीत घडला प्रकार.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Crime News : करणी काढण्याच्या बहाण्याने 60 हजाराची रक्कम उकळणारा भोंदूबाबाचा कारनामा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Andhashraddha Nirmoolan Samiti) पुढाकाराने कोल्हापुरात उघडकीस आला. या भाेंदूबाबाला शाहूपुरी पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. (Maharashtra News)

कोल्हापुरातील फ्रेंड्स कॉलनीत श्री महालक्ष्मी ज्याेतीषालय या नावाने ज्याेतीषालय आहे. हे एका बंगल्यात चालते. पंडित विनायक शास्त्रीजी याने हा बंगला भाड्याने घेतल्याचे समजते. येेथे ताे त्याचा व्यवसाय करीत असताे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका नागरिकाने त्याला व्यवसायत अडचणी जाणवू लागल्याने त्याने पंडित विनायक शास्त्री (बाबा) याच्याकडे आपल्या समस्या सांगितल्या हाेत्या. त्यावेळीस बाबाने अडचणींचा निपटारा करण्यासाठी काही सूचना केल्या. त्यासाठी संबंधितांकडून पाच हजार रुपये शुल्क घेतले. त्यानंतरही नागरिकाच्या अडचणी सुटल्या नाहीत.

त्यामुळे त्याने अंनिस डाॅ. सीमा पाटील, गीता हासुरकर यांच्याशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. या बाबाचे समाजापूढे खरे रुप आणण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्याची भेट घेत काेराेना काळात आम्ही नातेवाईकांना आमची जमीन दिली. ती जमीन नातेवाईक आम्हांला देत नाहीत असे सांगितले. बाबाने तुमच्यावर करणी झाल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांना सांगितले. पूजा अर्चा करुया. जमीन मिळेल. त्यासाठी 60 हजार रुपये लागतील असे सांगितले.

आज (शनिवार) दुपारी तीन वाजता अंनिसचे कार्यकर्ते शाहूपूरी पाेलीसांच्या समवेत बाबाच्या बंगल्यावर गेले. ठरल्याप्रमाणे बाबाने गंडे, दाेरे साहित्यसह पूजा केली. त्यानंतर सर्व काही चांगले हाेईल असे म्हणत त्यांना काही गाेष्टी दिल्या. अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या सापळ्यात भाेंदूबाबा अलगद अडकला. शाहूपूरी पाेलीसांनी बाबाला ताब्यात घेतले.

शाहूपुरी पोलीसांच्या पथकाने भोंदूबाबाकडील अंगारा आणि दोरे यासह अन्य साहित्य जप्त केले आहे. भोंदूबाबा आणि त्याचे सहकारी पोलीसांच्या ताब्यात असून त्याची चाैकशी सुरु असल्याची माहिती अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT