Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur : मित्रांसोबत फिरायला गेला तो परतलाच नाही; भारंगी नदीत बुडून युवकाचा मृत्यू

Shahapur News : शहापूर तालुक्यातील पळसपाडा येथील भारंगी नदी जवळ फिरण्यासाठी आले होते. भारंगी नदीला पाणी असल्याने सर्व मित्र पोहण्यासाठी नदीत उतरले. मात्र सारंग पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडाला

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
पळसपाडा (शहापूर)
: कल्याण येथून पळसपाडा परिसरात फिरण्याच्या निमित्ताने सहा मित्र गेले होते. मात्र येथे फिरणे एका मित्राच्या जीवावर बेतले आहे. भारंगी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात सहा जणांपैकी एक जण नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शोध कार्य सुरू करण्यात आले आहे. 

शहापूर तालुक्यातील पळसपाडा येथे घडलेल्या घटनेत सार्थक गणेश कोळी (वय १७) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान सार्थक कोळी हा आपल्या पाच मित्रांसोबत कल्याण येथून शहापूर तालुक्यातील पळसपाडा येथील भारंगी नदी जवळ फिरण्यासाठी आले होते. भारंगी नदीला पाणी असल्याने सर्व मित्र हे पोहण्यासाठी नदीत उतरले होते. मात्र सारंग हा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडाला. 

शोधकार्य सुरूच 
२ जुलैला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सदर घटना घडली असून सार्थक कोळी हा नदीत बुडला असून याचा मित्रांनी शोध घेतला मात्र आढळून आला नाही. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बचाव पथक दाखल होऊन शोधकार्य सुरु केले. मात्र त्याचा काही थागंपत्ता लागला नाही. यानंतर आज पुन्हा सकाळी सात वाजेल्या पासून बुडालेल्या सार्थकचा जीवरक्षक टिमच्या सदस्यांकडून शोध कार्यला सुरवात केली आहे. 

पावसाळ्यात दरवर्षी घडतात घटना 

नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत. तर महत्वाची बाब म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात फिरायला येणाऱ्या कोणाचा ना कोणाचा बुडून मृत्यू होत असतो. तरी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशानंतर सुध्दा काही तरूण फिरण्यासाठी या ठिकाणी येत असतात. यामुळे अशा घटना सातत्याने घडत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमित शहांच्या दौऱ्यावरून भाजप-काँग्रेस आमने सामने

केसगळती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल हर्बल हेअर ऑइल, कधी आणि कसं लावायचं? जाणून घ्या

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! MACP योजनेचे नियम बदलले; 'या' कर्मचाऱ्यांना आता एक रुपयाही मिळणार नाही

Heart Attack : BP नॉर्मल असतानाही येतो हार्ट अटॅक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करणे पडते महागात

Farmers Protest : मुगाला १०० टक्के हमीभाव, हजारो शेतकरी आक्रमक; ७ दिवसांचं अन्न-पाणी घेऊन ठिय्या, शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT