फैय्याज शेख
शहापूर : मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून तरुणाने व्हिडीओ तयार केला होता. समाज माध्यमांवर प्रसारित करण्यासाठी चित्रफित तयार करणाऱ्या नाशिक येथील दोन तरूणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी अटक केली आहे.
राजा हिम्मत येरवाल (वय २०), रितेश हिरालाल जाधव (वय १८) असे ताब्यात घेतलेल्या तरुणांचे नावे आहेत. ते दोघेही नाशिक येथील रहिवासी आहेत. दहा दिवसापूर्वी (Kasara Railway Station) कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये बेकायदा घुसून राजा आणि रितेश यांनी एक चित्रफित तयार केली होती. या चित्रफितीमध्ये ते मोटरमन असल्यासारखे आणि तेथील यंत्रणेची हाताळणी करत होते. ही चित्रफित या तरूणांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. (Local Train) लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून चित्रफित तयार करण्यात आल्याने रेल्वेच्या सायबर सुरक्षा विभागाने समाज माध्यमांतील या चित्रफितीच्या अनुषंगाने तपास सुरू केला होता.
रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी या दोन्ही तरूणांची ओळख पटवली. (Nashik) नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजटाच रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी नाशिकमध्ये या तरूणांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवत दोन्ही तरूणांना नाशिकमधून अटक केली आहे. असाच प्रकार यापूर्वी गुलजार शेख याने करून रेल्वे रुळाशी छेडछाड केली होती. त्यालाही अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.