Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू होताच आत्तापर्यंत चार अपघात

Shahapur News : मुंबई ते नागपूर अशा साकारण्यात येत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम पहिल्या टप्पात पूर्ण झाले आहे. तर या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील ७६ किलोमीटरचे काम अद्याप बाकी आहे

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे मृत्यूचा महामार्ग अशी ओळख झाली आहे. दरम्यान या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम सुरु होताच आतापर्यंत चार अपघात झाले असून या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हा अपघात आणखी किती जणांचे बळी घेणार असे बोलले जात आहे. 

मुंबई ते नागपूर अशा साकारण्यात येत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम पहिल्या टप्पात पूर्ण झाले आहे. तर या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील ७६ किलोमीटरचे काम अद्याप बाकी आहे. महामार्गाच्या इगतपुरी ते आमने असा शेवटच्या टप्प्याच्या कामाचे नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे हस्ते पार पडला. 

अनेकांचे गेले बळी 

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावर आतापर्यंत अनेक भीषण अपघात झाले आहेत. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर आता शेवटचा ७६ किलोमीटरचा टप्पा सुरू झाले आहे. मागील आठवड्यात लोकार्पण करण्यात आले असून या लोकार्पणच्या दुसऱ्या दिवसापासून सलग चार दिवस अपघात झाले आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झालेला आहे. तर पाच ते सहा लोक जखमी झाले आहेत. 

टायरची हवा तपासण्यासाठी उतरताच कारने उडविले  

शहापूर तालुक्यातील नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर टोल नाक्यावर एका ट्रक चालकाने टायरची हवा तपासण्यासाठी रस्त्याच्या साईडला ट्रक घेत खाली उतरला. याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव कारने ट्रक चालकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शहापूर येथील उप जिल्हा रूग्णालयात आणले असून पुढील तपास शहापूर पोलिस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT