फैय्याज शेख
शहापूर : जगातील सर्वात कठीण अल्ट्रा मॅराथॉन कॉमरेड्स मॅराथॉन ९० किमी अंतर असलेली साऊथ आफ्रिका देशातील डर्बन ते पीटर्समार्गबर्ग शहरांमध्ये घेण्यात येते. या वर्षी सदर कॉमरेड मॅराथॉन स्पर्धा ८ जूनला पार पडली. ही स्पर्धा सलग दोन वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करून ठाणे वन क्षेत्रातील शहापूर वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी वाशाळा या पदावर कार्यरत विशाल विठ्ठल गोदडे यांनी नवा विक्रम नोंदविला आहे. असा विक्रम करणारे ते भारतीय वन विभागातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत.
साऊथ आफ्रिका देशातील डर्बन ते पीटर्समार्गबर्ग शहरांमध्ये ९० किमी अंतराची हि स्पर्धा दरवर्षी घेण्यात येत असते. यंदा हि स्पर्धा ८ जूनला पार पडली असून यात शहापूर वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल विठ्ठल गोदडे यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा त्यांनी ११ तास ३२ मिनिटे एवढ्या वेळात पुर्ण केली आहे. तसेच गेल्या वर्षी ही स्पर्धा त्यांनी ११ तास ३५ मिनिटे वेळात पुर्ण केली होती. त्यासाठी त्याना विशेष पदक प्राप्त झाले आहे.
आयर्नमॅन किताब मिळवणारे पहिले वनाधिकारी
गोदडे यांनी यापुर्वी मलेशिया देशातील लंकावी या ठिकाणी नोव्हेंबर २०२२ ला झालेल्या जगातील सर्वात कठीण एक दिवसीय आयर्नमॅन या स्पर्धेत सहभागी होवुन १५ तास ४३ मिनिटांत सदर स्पर्धा पूर्ण केली होती. पहिल्याच प्रयत्नात आयर्नमॅन हा जागतिक बहुमानाचा किताब देखील त्यांनी मिळविलेला आहे. सदरचा किताब मिळवणारे भारतीय वन विभागातील ते पहिलेच अधिकारी आहेत. त्यानंतर १० सप्टेंबर २०२३ रोजी जगातील समुद्रसपाटीपासुन सर्वात उंच ठिकाणी होणारी लडाख मॅराथॉन देखील यशस्वीरित्या त्यांनी पुर्ण केलेली आहे.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
यश प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षक अमित कुमार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. तसेच पत्नी पुजा गोदडे यांची देखील विशेष साथ लाभली. तर वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी असलेले तसेच शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या भावसे गावचे भूमिपुत्र विशाल गोदडे यांनी क्रिडा क्षेत्रात ज्याप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे वन विभागात देखील आपले शासकीय कर्तव्य चौक बजावून वनसंरक्षण व संवर्धन, जल व मृद संधारण, रोपवाटीका कामे, वनांतील इमारत बांधकामे इत्यादी स्वरुपाची अनेक नाविण्यपुर्ण कामे केलेली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.