Nagpur : सरकारी धान्याचा काळाबाजार; २०० पोते तांदूळ नेताना जप्त

Nagpur News : प्रत्येक रेशन धान्य दुकानात याचा पुरवठा करण्यात येत असतो. मात्र बऱ्याचदा लाभार्थ्यांना पूर्ण धान्य दिले जात नाही. तर काही लाभार्थी आले नाही त्यांच्या हिस्स्याचे धान्य विक्री केले जात असते
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On

पराग ढोबळे 

नागपूर : गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येत असते. मात्र या सरकारी धान्याचा काळाबाजार केला जात असल्याचे समोर आले आहे. अशा पद्धतीने काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असताना २०० पोती तांदूळ घेऊन जाणारा ट्रक   नागपूरच्या ताजनगरमध्ये अन्न पुरवठा विभाग आणि पोलिसांनी कारवाई करत पकडला आहे.

रेशन कार्ड धारकांना दार महिन्याला मोफत धान्य वाटप करण्यात येत असते. यात प्रामुख्याने तांदूळ, गहू तर कधी ज्वारी देखील वाटप करण्यात येत असते. यासाठी अन्न पूरवठा विभागाकडून प्रत्येक रेशन धान्य दुकानात याचा पुरवठा करण्यात येत असतो. मात्र बऱ्याचदा लाभार्थ्यांना पूर्ण धान्य दिले जात नाही. तर काही लाभार्थी आले नाही त्यांच्या हिस्स्याचे धान्य विक्री केले जात असते. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असतो. 

Nagpur News
Latur Bajar Samiti : शेतकऱ्यांच्या मुलींसाठी वसतिगृह; लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्वपूर्ण पाऊल

ट्रकमध्ये भरला जात होता तांदूळ

दरम्यान अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताज नगरमध्ये सरकारी धान्य ट्रकमध्ये भरून घेऊन जात असल्याची माहिती अन्न पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर एका टिनाच्या शेडमधून तांदळाची पोती काढून ट्रकमध्ये ठेवली जात असल्याचे आढळून आले. 

Nagpur News
Dombivali : नियम तोडणारे रिक्षा चालक पोलिसांच्या रडारवर; डोंबिवलीत ५ हजार चालकांवर दंडात्मक कारवाई

तांदूळ जप्त करत गुन्हा दाखल 

तांदळाची पोती मोहम्मद वसीम याचे असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून पावती मागितल्यावर पावती देण्यास टाळाटाळ करू लागला. यानंतर अन्न पुरवठा अधिकारी आणि पोलिसांनी २०० पोती तांदुळासह धान्य ट्रक असा १४ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. तर मोहम्मद वसीम याच्याविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com