Dombivali : नियम तोडणारे रिक्षा चालक पोलिसांच्या रडारवर; डोंबिवलीत ५ हजार चालकांवर दंडात्मक कारवाई

Dombivali News : रिक्षांमध्ये फक्त तीन प्रवाशांसाठी परवानगी असूनही अनेक चालक जादा पैसे कमावण्यासाठी चालकाच्या आसनाजवळही प्रवासी बसवत चौथी सीट घेऊन वाहतूक करतात. प्रवासी आणि वाहन दोघांच्या सुरक्षेला धोका
Dombivali News
Dombivali NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: बेशिस्त आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील सहा महिन्यांत डोंबिवलीतील रिक्षा चालकांकडे गणवेश, परवाना, नामपट्टी, रिक्षांचे आयुर्मान संपल्यानंतरही रिक्षा चालवत असलेल्या आणि रिक्षात नियमापेक्षा जास्त सीट बसविले जात आहेत. अशा पाच हजार पेक्षा अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  

डोंबिवली शहर परिसरात बेशिस्तीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या पाच हजाराहून अधिक रिक्षा चालकांवर गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रिक्षांमध्ये फक्त तीन प्रवाशांसाठी परवानगी असूनही अनेक चालक जादा पैसे कमावण्यासाठी चालकाच्या आसनाजवळही प्रवासी बसवत चौथी सीट घेऊन वाहतूक करतात. जो प्रवासी आणि वाहन दोघांच्या सुरक्षेला धोका ठरतो. 

Dombivali News
Shahada Police : सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक; शहादा पोलिसांची मोठी कारवाई, २५ लाखाचा गुटखा जप्त

नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई 

धोकादायक प्रवास थांबावा; यासाठी डोंबिवली वाहतूक पोलिसानी फडके रस्त्यावरून शेलार नाका, टिळक रस्ता, आयरे रोड, मानपाडा परिसरापर्यंत अनेक ठिकाणी विशेष मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत गणवेश नसलेले रिक्षाचालक, परवाना वा नामपट्टी नसलेले, तर काही रिक्षांचे आयुर्मान संपलेले आणि चौथी सीट बसविणाऱ्या रिक्षा चालकावर मोटर वाहन कायद्यानुसार ई-चालानद्वारे दंड आकारण्यात आले. 

Dombivali News
Latur Bajar Samiti : शेतकऱ्यांच्या मुलींसाठी वसतिगृह; लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्वपूर्ण पाऊल

तर आता परवाना, बॅच रद्दची कारवाई 

वाहतूक पोलिसांच्या रडारवर चौथी सीट बसविणारे रिक्षा चालकावर आहेत. रिक्षा चालक चौथी सीट प्रवासी आणि रिक्षा चालक दोघांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत. यामुळे नागरिकांना आणि रिक्षा चालकांना नियम पाळण्याचे आवाहन केले असून यापुढे नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने व बॅच रद्द करण्याचा इशारा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com