Shahapur Vidhan Sabha 2024 Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Vidhan Sabha : नेतेच गेल्याने घ्यावी लागली माघार; श्रेयवादाच्या लढाईत उच्च शिक्षित तरुणाची माघार

Shahapur News : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरण्यात आले. मात्र उमेदवारी न मिळाल्याने काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु करण्यात आला आहे. बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांकडून देखील प्रचार सुरु झाला असून शहापूर विधानसभेत अपक्ष उमेदवारी करणारे उच्चशिक्षित तरुणाला श्रेयवादाच्या लढाईत माघार घ्यावी लागली आहे. आता महाविकास आघाडीला पाठींबा दर्शविण्यात आला आहे.    

विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) बिगुल वाजल्यानंतर इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरण्यात आले. मात्र उमेदवारी न मिळाल्याने काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यानुसार काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला (Shahapur) शहापूर विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही. यामुळे गाजावाजा करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले व ते कायम ठेवत महाविकास आघाडीसोबत बंडखोरी केली. यात अविनाश शिंगे या उच्च शिक्षित तरूणाला रिंगणात उतरविले. माघारीच्या दिवशी देखील माघार न घेता अर्ज कायम ठेवण्यात आला होता. 

शिट्टी निशाणावर निवडणूक लढवायची हे निश्चित झाले असतानाच बंडखोर उमेदवाराला उभे करणाऱ्या नेत्यांनीच पळ काढला. नेतेच नसल्याने उच्च शिक्षित तरुण उमेदवाराचा यात नाहक बळी गेला आहे. अविनाश शिंगे यांनी शहापूर विधानसभा रिंगणातून माघार घेत महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील तरूण वर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. कोणाच्या दबावापोटी तर हा निर्णय घेतल्याची चर्चा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Maharashtra Live News Update: धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भांडगाव येथील विश्वरुपा नदिवरील पुल ढासळला

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

SCROLL FOR NEXT