Aditya Thackeray : महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राची लूट केली; आदित्य ठाकरेंचा आरोप

Sambhajinagar News : महाविकास आघाडीकडून आजपासून मराठवाड्यात प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून यात संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला
Aditya Thackeray
Aditya ThackeraySaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची लाट आहे. मविआची पंचसूत्री जाहीर झाली आहे. आमचा वचननामा देखील जाहीर झाला. महाराष्ट्राची लूट या सरकारने केली असून मराठवाड्यात याच ठिकाणी बैठक झाली होती. त्यामध्ये फक्त घोषणा झाल्या, विभागाकडे काय आले, याचे उत्तर त्यांनी अजूनही दिले नाही. कारण मुळात काही आलेच नाही. भाजपच्या माध्यमातून एकनाथ शिंदे फसवणूक करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

महाविकास आघाडीकडून आजपासून मराठवाड्यात प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून यात संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कि भाजप खोटे बोलणारा मोठा पक्ष जुमलेबाज पक्ष आहे. काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार जरी केली तरी निवडणूक आयोग कितपत कारवाई करेल हे माहिती नाही. आयोग आणि इतर संस्थांवर कितपत विश्वास ठेवावा. त्यांनी काही पाऊल उचलले तर विश्वास ठेवता येईल. मात्र आमचा जनतेवर विश्वास आहे.

Aditya Thackeray
Sambhajinagar News : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळीच ठाकरे गटाला मोठी खिंडार; २ माजी नगरसेवकांसह १२ जणांनी दिले राजीनामे


गृहमंत्री आरोप करत असतील, तर इतर ठिकाणी गुंड पाकीट मार फिरतात. त्यांच्यावर का बोलत नाही. एका एपीआयवर हल्ला झाला, त्यावर देखील काही बोलले नाही. महिलांवर अत्याचार वाढत चालले, महिला सुरक्षित नाही. त्यावेळी फडणवीस कुठे होते. गृहमंत्री म्हणून त्यांचे काही कर्तव्य होते की नाही. अर्बन नक्षल म्हणजे जे भाजप विरोधात बोलतात त्यांना वापरतात.

Aditya Thackeray
Nandurbar News : धडगाव तालुक्यात १३ लाखांचा गांजा जप्त; शेतात करण्यात आली होती लागवड

भाजपमध्ये मेहनत करणारे दूर फेकले गेले 
पूनम महाजन काय बोलल्या मी ऐकलं नाही. मात्र त्यांना तिकीट का नाकारलं हा सर्वांच्या मनात प्रश्न आहे. गोपाल शेट्टी यांना तिकीट नाही दिले. भाजपचे नेते ज्यांनी मेहनत केली असे अनेक कार्यकर्ते दूर फेकले गेले आहे. यामध्ये प्रकाश मेहता, विनोद तावडे, राज पुरोहित, पंकजा मुंडे आणि पूनम महाजन यांना दूर फेकले गेले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com