Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur : शहापूर तालुक्यातील धरण ओव्हरफ्लो; मोठ्या प्रमाणात विसर्ग, गावांना सतर्कतेचा इशारा

Shahapur News : तानसा, भातसा, वैतरणा, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदी काठी असलेल्या अनेक गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात शहापूर तालुक्यात परतीचा पाऊस पडत आहे

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आल्याने नदीला देखील पूर आला आहे. सर्व नद्यानी ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

शहापूर तालुका व परिसरात रात्रीपासून तुफान पाऊस पडत असून शहापूर तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली अहेत. तालुक्यातील तानसा, भातसा, वैतरणा, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदी काठी असलेल्या अनेक गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात शहापूर तालुक्यात परतीचा पाऊस पडत आहे. 

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडले 

भातसा धरणाचे पाच दरवाजे साडेतीन मीटरने उघडल्याने धरणातून ६६ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झाले असून या धरणा मधून ४८ हजार २२३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर तानसा धरणाचे स्वयंचलित सर्व ३८ दरवाजे उघडले गेले असून या मधून ४१ हजार ९९९.८८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे या तीन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.

खर्डी बाजारपेठेतील दुकानात शिरले पावसाचे पाणी
शहापूर तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायत हद्दीतील बाजारपेठेतील गटारी पावसाळ्या पुर्वी साफसफाई न केल्याने बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील सामनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खर्डी ग्रामपंचायती बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गटारी साफ न केल्याने दुकानदारांचे नुकसान कोण भरून देईल असे व्यापारी बोलत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबई, ठाण्यात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले

Maharashtra News Live Update: बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन..

SCROLL FOR NEXT