Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur : सर्पदंशानंतर मुलगा विव्हळत राहिला; उपचार न मिळाल्याने अखेर मुलाचा मृत्यू; शहापूर उपजिल्हा रूग्णालयातील धक्कादायक प्रकार

Shahapur News : संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. बॉल लांब गेल्याने तो बॉल आणण्यासाठी गेला असता त्याला विषारी सापाने दंश केला. दंश झाल्याचे लक्षात येताच तो घरी गेला

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : शहापूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळत असताना १४ वर्षीय मुलाला सर्पदंश झाला. या मुलाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या सर्पदंश झालेल्या मुलावर उपचार करण्यात दिरंगाई करण्यात आली. पालक एक तासभर उपचारासाठी विनंती करत राहिले. मात्र उपचार न मिळाल्याने अखेर या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथील प्रेम लहानु सदगीर (वय १४) असे घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान प्रेम हा काल संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. बॉल लांब गेल्याने तो बॉल आणण्यासाठी गेला असता त्याला विषारी सापाने दंश केला. दंश झाल्याचे लक्षात येताच तो घरी गेला. यानंतर लगेच त्याला शहापूर येथील उप जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

उपचारासाठी डॉंक्टरांकडे विनवणी 

मात्र तंत्र व माहीतीगार डॉक्टर नसल्याने केवळ रक्त तपासणीच्या आधारावर या १४ वर्षीय बालकावर एक तास कोणताही उपचार न केल्याने अखेर त्याचा बेडवर तडफडत मृत्यू झाला. तो जीवंत असताना त्यांनी उपचारासाठी खूप विनंती केल्या. मात्र कोणीही त्याचा विनंतीकडे लक्ष दिले नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तो उपचारासाठी विनवणी करत राहीला. मात्र त्याचा या विनवणीला देखील डॉक्टरांनी भिक घातली नाही; अखेर त्याच बेडवर आई वडिलांच्या समोर मुलाचा मृत्यू झाला.  

रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा अभाव 

एकूलता एक मुलाचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने आई- वडिलांच्या मायेचा टाहो फुटला. जर मोठे रूग्णालय बनवून त्या रूग्णालयात तंत्र डॉक्टर नसतील, तर गोरगरीब जनतेला उपचार कसा मिळणार? शहापूर तालुक्यात नेहमी साथीचे रोग तसेच अतिदुर्गम जंगल भाग असल्याने शेतावर शेतकऱ्यांना नेहमीच सर्पदंश होत असतात. मात्र वेळेवर उपचार मिळत नसल्याने शेतकरी व शाळकरी विद्यार्थींचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधी या आरोग्य व्यवस्थेबाबत उपाययोजना करत नाही. शहापूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयात, उपजिल्हा रूग्णालय असताना तंज्ञ डॉक्टरविना ओस पडली आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार; समोर आली अपडेट

Indrayani : इंद्रायणीची घोषणा! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार शाळेची पायाभरणी, कोण असणार खास व्यक्ती?

Shocking : धक्कादायक प्रकार! अंगणवाडीच्या खाऊमध्ये आढळला मेलेला उंदीर

गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ, धमक्या अन् बलात्कार; कल्याणच्या राजकीय पक्षातील तरूणानं प्रेयसीला छळलं

SCROLL FOR NEXT