Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Shahapur News : तीन मुलींचे पालनपोषण करणे व त्यांचा खर्च परवडत नव्हता. यामुळे मुलींच्या आईने मुलींना संपवण्यासाठी शेतात वापरल्या जाणाऱ्या तन नाशक औषध आणून मुलींच्या जेवणात टाकले

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : मुलींचा सांभाळ करणे तसेच त्यांच्या पालन पोषणाचा खर्च करणे परवडत नाही; या विचारातून आईनेच पोटच्या तीन मुलींना संपविल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. मुलींना जेवणातून फवारणीचे औषधी दिले होते. दरम्यान मुलींवर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आईला ताब्यात घेतले आहे. 

शहापूर तालुक्याच्या चेरपोली गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली होती. मागील काही दिवसांपूर्वी सख्या तीन लहान बहिणींना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले होते. या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काव्या संदीप भरे (वय १०), दिव्या संदीप भरे (वय ८), गार्गी संदीप भेरे (वय ६) असे मृत झालेल्या मुलींची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

जेवणात टाकले विष 

दरम्यान मुलींची आई ही वर्षभरापासून शहापूर तालुक्याच्या असस्नोली या गावी तिच्या माहेरी मुलींना घेऊन गेली होती. मात्र तीन मुलींचे पालनपोषण करणे व त्यांचा खर्च परवडत नव्हता. यामुळे मुलींच्या आईने मुलींना संपवण्यासाठी शेतात वापरल्या जाणाऱ्या तन नाशक औषध आणून मुलींच्या जेवणात टाकले. मुलींनी जेवण केल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. यानंतर सासरच्या लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काल या मुलींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

मुलींच्या मृत्यूनंतर धक्कादायक माहिती समोर 

तीनही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या तिन्ही बहिणींचा एका मागून एक असा तीन दिवसात तिघींचा मृत्यू झाला. या मृत्यूने शहापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केला जात होते. या नंतर मुलींच्या आई संध्या भेरे (वय ३०) हिची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने किन्हवली पोलिसांनी तिला ताब्यात घेत चौकशी केली. यानंतर आईनेच तीन मुलींना जेवणातून विष दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर संध्या भेरे किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून तिला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल ३० मिनिटे उशिराने

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स कसं चेक करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT