Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Beed News : लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे मृतदेहाची अंत्यसंस्कारासाठी गैरसोय होते. यामुळे संतप्त नातेवाईकांनी नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर मृतदेह ठेवून निषेध व्यक्त केला
Ambajogai Nagar Parishad
Ambajogai Nagar ParishadSaam tv
Published On

योगेश काशीद 

बीड : गावात स्मशानभूमी नसल्याने मृतदेहावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार अंबाजोगाईमध्ये होत असून जागा मिळण्याबाबत मागणी करून देखील लिंगायत समाजाला स्मशानभूमी मिळत नसल्याने समाज बांधव आक्रमक झाले आहेत. तर स्मशानभूमी नसल्याने मृतदेह थेट नगरपरिषद कार्यालयाबाहेर आणून ठेवला आहे. 

भारतीय जनता पार्टीच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या गावात (अंबाजोगाई) लिंगायत समाजाला स्मशानभूमी नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मृतदेह नगर परिषद कार्यालयासमोर ठेवल्याची गंभीर घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरातील ही गंभीर घटना आहे. अंबाजोगाई शहरात लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे मृतदेहाची अंत्यसंस्कारासाठी गैरसोय होत असते. यामुळे संतप्त नातेवाईकांनी अंबाजोगाई येथील नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर मृतदेह ठेवून आपला निषेध व्यक्त केला.

Ambajogai Nagar Parishad
Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

त्या जागेवर अंत्यसंस्कारासाठी विरोध 
दरम्यान अंबाजोगाई येथील लिंगायत समाजाची स्मशानभुमि बाराखांबी परिसरात आहे. तेथील जागा पुरातत्व खात्याने अतिक्रमित केली आहे. त्यामुळे स्थानिक लिंगायत नागरिकांच्या अंत्यविधीसाठी आता जागा राहिली नाही. मृतदेह तेथे नेल्यास अंत्यविधी साठी विरोध केला जातो. यामुळे समाज बांधवानी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. 
       

Ambajogai Nagar Parishad
Nandurbar Accident : धुळे- सुरत महामार्गावर दोन भीषण अपघात; कोंडाईबारी घाटात वाहतूक विस्कळीत

रविवारी नगर परिषद कार्यालयासमोर ठेवला मृतदेह 
नगरपालिकेचे निवृत्त कार्यालयीन अधिक्षक कै. गणपत अप्पा वाघमारे (रा रविवारपेठ) यांचे पार्थिव रविवार असताना देखील नगर परिषद कार्यालयासमोर आणून लिंगायत बांधवांनी ठिय्या अंदोलन केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com