Shahapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Crime : पाणी बॉटल घेण्यास खाली उतरताच साधला डाव; शिवशाही बसमधून प्रवास करताना दीड कोटीचे दागिने लंपास

Shahapur News : भाईंदर पूर्व येथील रहिवाशी असलेले किरणकुमार पुरोहित (वय ४४) यांचा सोने- चांदी बनवण्याचा व्यवसाय असून ते विविध शहरातील ज्वेलर्स दुकानदारांना सोने- चांदीच्या दागिन्यांची विक्री करतात

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : सोन्याचा व्यापार उरकून संगमनेरमार्गे मुंबईनाका नाशिकहून मुंबईच्या दिशेने परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने निघालेले व्यापाऱ्याजवळील १ कोटी ६८ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि २ लाख रोख रक्कमेवर चौघा अज्ञातांनी डल्ला मारला आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई- नाशिक महामार्गाच्या उंबरमाळी गाव हद्दीतील हॉटेल फेमस येथे उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भाईंदर पूर्व येथील रहिवाशी असलेले किरणकुमार पुरोहित (वय ४४) यांचा सोने- चांदी बनवण्याचा व्यवसाय असून ते विविध शहरातील ज्वेलर्स दुकानदारांना सोने- चांदीच्या दागिन्यांची विक्री करतात. दरम्यान शुक्रवारी श्रीरामपूर, लोणी, कोपरगाव, राहता आणि संगमनेर या शहरांमध्ये जाऊन पुरोहित यांनी मंगळसूत्र आणि विविध प्रकारच्या छोट्या दागिन्यांची विक्री केली. त्यानंतर उरलेले सोने- चांदीचे दागिने आणि व्यापारातून मिळालेली रोख रक्कम बॅगेत घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले होते.

पाण्याची बॉटल घेण्यास खाली उतरताच बॅग गायब 

रात्री बारा वाजेच्या सुमारास नाशिक- बोरिवली या शिवशाही बसने ते भाईंदर येथे जाण्यासाठी प्रवास सुरू केला. मात्र रात्री १:३० वाजता बस उंबरमाळी गाव हद्दीतील मुंबई- नाशिक महामार्गावर असलेल्या हॉटेल फेमस येथे थांबविण्यात आली होती. दरम्यान किरणकुमार पुरोहित यांनी आपल्या जवळ असलेली सोन्या- चांदीची बॅग आसनावर ठेवून पाणी बॉटल घेण्यासाठी खाली उतरले. त्या दरम्यान प्रवासात असलेल्या अज्ञात चौघांनी बॅग लंपास करून कारमधून मुंबईच्या दिशेने पोबारा केला.  

बस चालकाने केला पाठलाग 

पुरोहित हे पुन्हा बसमध्ये आले असता त्यांना बॅग निदर्शनास आली नाही. बॅग कोणीतरी घेऊन गेले असल्याचा प्रकार बस कंडक्टर यांच्या सांगण्यातून पुरोहित यांच्या लक्षात आला. त्यानंतर बस चालकाने कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता कार रस्त्यावर दिसून आली नाही. आपल्याजवळील मौल्यवान अर्थात सोने चांदीच्या- दागिने चोरीला गेल्याने किरणकुमार पुरोहित यांना धक्का बसला आहे. त्यांनी कसारा पोलिस ठाणे गाठून घडलेल्या प्रकारचा जबाब नोंदवून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश गावित हे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

SCROLL FOR NEXT