Bhandara Police : वाळू तस्करी रोखण्यासाठी चेकपोस्टवर कडक निगराणी; महसूल व पोलिसांचे सात संयुक्त पथक

Bhandara News : अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करण्यात येत असते. प्रामुख्याने वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत असते. रात्रीच्या वेळी बेसुमार चोरटी वाहतूक होत असल्याने प्रशासन देखील हतबल झाले आहे
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: वाढता वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. जिल्ह्यातील ११ चेकपोस्टवर कडक निगराणी ठेवण्यात येणार असून यासाठी महसूल व पोलिसांची संयुक्त पथके तैनात राहणार आहेत. अर्थात जिल्ह्यात होणारी वाळूची तस्करी रोखण्यासाठी ७ संयुक्त पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. 

अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करण्यात येत असते. प्रामुख्याने वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत असते. रात्रीच्या वेळी बेसुमार चोरटी वाहतूक होत असल्याने प्रशासन देखील हतबल झाले आहे. अनेकदा कारवाया केल्यानंतर चोरून वाळू वाहतूक केली जात असते. याला आळा घालण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने आपले पाऊल उचलले आहे. 

Bhandara News
America Car Accident: अमेरिकेमध्ये भीषण कार अपघातामध्ये ३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जण जखमी

चेकपोस्टवर २४ तास निगराणी  

भंडारा जिल्ह्यातील रेती व इतर गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल आणि पोलिस विभागाने मिळून संयुक्त पथकांचे गठण केले आहे. त्या अंतर्गत जिल्ह्याच्या सीमेवरील ११ चेकपोस्टवर कडक निगराणी केली जाणार आहे. नागपूर विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्व चेकपोस्ट, तालुकानिहाय भरारी पथके व जिल्हा खनिकर्म भरारी पथकांना २४ तास दक्ष राहून निगराणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Bhandara News
Pune News: पुणेकरांना मिळणार आणखी दोन वंदे भारत ट्रेन, या लोकांना होणार फायदा

सात पथक राहणार तैनात 

त्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व ११ चेकपोस्टवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या पाळीने केल्या आहेत. यासाठी सात पथक तयार करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यातील रेती व इतर गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांची सात संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com