मनसे आणि ठाकरे गट यांच्या वादात आता शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उडी घेतली आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या गाड्यांवर सुपार्या टाकल्यानंतर तुमच्या गाड्यांवर नारळच पडतील, असा खोचक टोला सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे अलीकडेच मराठवाडा दौऱ्यावर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपार्या फेकून आंदोलन केले होते.
त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या टाकून प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी या वादात उडी घेत थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने राज्यात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू केले आहे. तुम्ही जर दुसऱ्यांच्या गाडीवर सुपार्या फेकत असाल तर त्यांनी बघत बसावे का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे हे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत असल्याचा आरोप केला.
सध्या राज्यात विरोधकांनी सगळ्यात वाईट राजकारण सुरू केलेले आहे. शब्दाला मर्यादा राहिलेली नाही. फक्त आया बहिणीवरून शिव्या देणे शिल्लक राहिले आहे, अशी खंत हीआमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.