Nashik: बस स्थानकावर 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; 4 जण अटकेत Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: बस स्थानकावर 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; 4 जण अटकेत

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिकः सामूहिक बलात्काराच्या घटनेने नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. नाशिकमधील वणी Vani Nashik येथे एका 40 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी चार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

हे देखील पहा-

घडलेल्या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा मित्र बसस्थानक Bus Stand Vani परिसरात बसले होते. तेव्हा या परिसरात असलेल्या संशयितांनी त्यांना येऊन त्यांना धमकी देऊ लागले आणि पीडितेवर बुधवारी (ता. २७) रात्री अकरा वाजता सामूहिक अत्याचार केला.

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात सामूहिक बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा Atrocity गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्वरित पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि या प्रकरणातील चारही संशयित व्यक्तींना अटक केली आहे. नाशिकसारख्या जिल्ह्यात सामूहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत मग आरोपींना पोलिसांची जराही भीती, जराही धाक राहिलेला नाही का, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.

आरोपी धमकी देतात अन् त्यानंतर निर्धास्त सामूहिक अत्याचार करतात. बसस्थानक सारख्या परिसरात अशा भयानक घटना घडतात. नाशिककरांकडून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT