Civil Line Police Station Akola Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक! अकोल्यात कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून 2 अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार

Sexual Assault On a Minor Girls In Akola: दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा बर्थडे साजरा करुन घराकडे निघाल्या होत्या.

जयेश गावंडे

Akola Crime News: राज्यात महिलांवर अत्याचाऱ्याच्या होणाऱ्या घटना काही थांबताना दिसत नाहीये. अकोल्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलींना कोल्ड ड्रिंकमधून दारु पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. अकोला शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा बर्थडे साजरा करुन घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक त्यांच्याच ओळखीतला युवक भेटला. यावेळी "तुम्हा दोघींना घरी सोडून देतो असं म्हणून त्याने दोघींनाही गाडीवर बसवलं. त्यानंतर तो या दोघींना सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पवन वाटिकेत घेऊन गेला. (Akola Crime News)

संतापजनक घटनेत चौघांचा समावेश

इथे आल्यावर त्याने चॉकलेट आणि थम्सअप नावाचं कोल्ड ड्रिंक दोघांनाही प्यायला दिलं. यावेळी त्या दोघींनी कोल्ड ड्रिंक प्यायलं आणि चॉकलेटही खाल्लं. कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर दोघींनाही गुंगी यायला लागली. याचा फायदा घेत तो युवक त्या दोघींनाही घेऊन टेरेसवर गेला आणि दोघींसोबत बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

त्याचवेळी त्याचा मित्रही तिथे दाखल झाला आणि त्यानेही त्या दोघींवर लैंगिक अत्याचार केले. या संपूर्ण घटनेत चार जणांचा सहभाग असल्याचे समजते. तर यातील दोघांनी दोन्ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तर अन्य दोघांनी त्यांना याबाबत सहकार्य केले असल्याचे कळते. (Maharashtra News)

अशी उघडकीस आली घटना

काल रात्री या दोन्ही अल्पवयीन मुलींना घरी पोहचायला उशीर झाला, म्हणजेच रात्रीचा एक वाजला. घरच्यांनी या दोन्ही मुलींना उशिरा आल्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर मुलींनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. यानंतर मुलींच्या पालकांना धक्काच बसला.

दोन्ही मुलींच्या नातेवाईकांनी तात्काळ सिव्हिल लाइन पोलिस ठाणे गाठले आणि मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल तक्रार दिली. सध्या या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांकडून (Civil Line Police Station Akola) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलं असून याबाबत तपास सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT