Buldhana Road Accident : बुलढाणा जिल्ह्यात खामगाव-शेगाव मार्गावर पहाटे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. एसटी बस, कार आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये २३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामधील जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाच वाजता शेगाव खामगाव महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. खासगी प्रवासी बस, एसटी बस व बोलेरो या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. प्रवासी साखरझोपेत असताना भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली, त्यानंतर पाठीमागून येणारी खासगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. त्यामुळे बोलेरोचा चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर २४ जण जखमी आहेत. जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रवासी साखरझोपेत असतानाच खामगाव-शेगाव महामार्गावर जयपूर लांडे फाट्यासमोर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. तीन वाहनांच्या विचित्र अपघातामुळे परिसर हादरून गेला होता. प्रवाशांच्या किंकाळ्या अन् जिव वाचवण्यासाठी धडपड होती. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत सांगितले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रूग्णालायत दाखल कऱण्यात आले.
तीन वाहनांच्या विचित्र अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातामधील २४ जखमींना उपचारासाठी खामगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील सहा जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उच्चस्तरीय उपचारासाठी बुलढाणा आणि इतर मोठ्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. पहाटे अपघात झाल्यानंतर जोरदार आवाज झाला, त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अन् जखमींना मदत केली. तत्काळ पोलिस आणि आपत्कालीन सेवांना सूचना देण्यात आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.