Mahableshwar Accident News, Buldhana, Akola saam tv
महाराष्ट्र

Mahableshwar Accident News: महाबळेश्वरच्या दरीत अपघातग्रस्तांच्या किंचाळ्या, आक्राेश सुरु; बुलढाणा, अकाेल्यातील मजूर

घटनास्थळी ट्रेकर्सने मदत कार्य सुरु केले आहे.

ओंकार कदम

Mahableshwar Accident News : महाबळेश्वरातील मुकदेव घाटात आज (शनिवार) सकाळच्या प्रहरी सुमारे 40 कामगारांसह ट्रक दरीत काेसळला. या अपघाताची माहिती कळताच पाेलिसांसह महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान घटनास्थळी रवाना झाले. काही अपघातग्रस्तांना सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांसह ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात पाठविले. या अपघातात तीस कामगारांसह दाेन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या ट्रकमधील जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. काही जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामधील दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथे पाठविण्यात येणार आहे.

मुकदेव गावानजीक तीव्र उतारावर हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेले कामगार हे बुलढाणा (buldhana) व अकोला (akola) भागातील आहेत. सुमारे 40 कामगार या अपघातात जखमी झाले आहेत. एकेक अपघातग्रस्तांस दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. (Maharashtra News)

हा अपघात (accident) झाला त्यावेळी परिसरात प्रवाशांच्या किंचाळ्यांचा आवाज आला. अपघतानंतर काही कामगारांचा आक्राेश सुरु हाेता. ग्रामस्थ अपघातग्रस्तांना दिलासा देत रुग्णालयात (hospital) पाठवित आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT