राज्यात नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे सात रुग्ण; तिसऱ्या लाटेला ठरणार कारणीभूत  google
महाराष्ट्र

राज्यात नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे सात रुग्ण; तिसऱ्या लाटेला ठरणार कारणीभूत

रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर याठिकाणी या नव्या व्हेरीयंटच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यसह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर राज्यात परिस्थिति काहीशी आटोक्यात आली आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्यावर तिसऱ्या लाटेच्या संकट दरात उभे राहिले आहे. याचे कारण म्हणजे राज्यात कोरोनाच्या नवी डेल्टा प्लस व्हेरियंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर याठिकाणी या नव्या व्हेरीयंटच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट भारतातच पहिल्यांदा आढळून आला असून तो डेल्टा किंवा बीटा 1. 617.2 या विषाणूमध्ये बदल होऊन तयार झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तथापी, हा व्हेरीयंट किती धोकादायक ठरू शकतो याबाबत सध्या संशोधन सुरू आहे.

नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरी याठिकाणी आढळून आलेल्या नव्या व्हेरीयंटचच्या रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीस्थी पाठवण्यात आले आहेत. राज्यात आढळून आलेल्या नव्या व्हेरीयंटच्या सात रुग्णांपैकी पाच जण रत्नागिरी येथील आहेत. त्यानंतर प्रशासनाने लगेच, डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळलेलं गाव त्वरित सील केलं आहे. पाच पैकी दोन रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे रत्नागिरीमधील डॉक्टर संघमित्रा गावडे यांनी म्हटलं. दरम्यान, चिंताजनक बाब म्हणजे गेल्या आठवड्यात रत्नागिरीचा पॉझिटिव्हिटी रेट 13.7 टक्के इतका होता. राज्यात सर्वाधिक रुग्णवाढ होणाऱ्या अव्वल दहा जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचाही समावेश आहे.

तर नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरी येथे आढळलेल्या, डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांचे नमुने आणखी काही ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या चाचण्याचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. काळजी वाढवणारी बाब म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तर इतर जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, प. बंगाल आणि कर्नाटक या राज्यात स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनच्या नियमात शिथिलता आणण्यास सुरवात झाली आहे. तर अद्यापही काही राज्यात परिस्थिती गंभीर असल्यामुळे लॉकडाउनचे निर्बंध कडक करण्यात आलेल आहेत.

- डेल्टा प्लस व्हेरीयंट कसा तयार झाला?

डेल्टा किंवा बीटा 1. 617.2 विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनमुळे नवा डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला. या व्हेरियंटची लागण झालेल्या आजार किती बलवू शकतो, हे अद्याप कळून आलेले नाही. मात्र डेल्टा प्लस किंवा AY.1 या व्हेरियंटवर मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा परिणाम होत नसल्याचे तपासणीत समोर आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT