मुलांचा घरबसल्या अभ्यास घ्यायचाय? मग हे नक्की वाचा...
मुलांचा घरबसल्या अभ्यास घ्यायचाय? मग हे नक्की वाचा... google

मुलांचा घरबसल्या अभ्यास घ्यायचाय? मग हे नक्की वाचा...

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने विद्यार्थ्यांच्या घरगुती अध्ययनात पालकांच्या सहभागासंदर्भात मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे.
Published on

कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. मात्र ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने विद्यार्थ्यांच्या घरगुती अध्ययनात पालकांच्या सहभागासंदर्भात मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. या नियमावली नुसार, शाळा बंद असताना बालकांच्या अध्ययनात कोणतीही शैक्षणिक पात्रता असलेल्या पालकांना सहभागी होता येणार आहे. तसेच त्यासाठी ‘का’, ‘कशासाठी’ व ‘कशा प्रकारे’ याबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने ही नियमावली तयार करण्यात आली आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडलेला खंड लक्षात घेता त्यांच्या शिकण्यात सुधारणा करण्यासाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे. घरी राहूनच शिकण्याचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थ्याना सुरक्षित, गुंतवून ठेवणारे आणि शिकण्यासाठी सकारात्मक प्रभाव टाकणारे वातावरण ठेवणे, पाल्याकडून अवास्तव अपेक्षा न ठेवणे, तसेच आरोग्याची काळजी घेणे, पौष्टिक खाणे यासोबतच मुलांसोबत मौजमजेसाठी वेळ देणे, इत्यादि बाबी या नियमावलीत नमूद करण्यात आल्या आहेत. तथापि, ही नियमावली केवळ पालकांसाठी नसून कुटुंबातील इतर सदस्य म्हणजेच आजी-आजोबा यांच्यासाठीही तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर समाजातील इतर घटक आणि मुलांच्या विकासात हातभार असणारी त्यांची मोठी भावंडे यांनाही ही नियमावली मार्गदर्शन करते.

मुलांचा घरबसल्या अभ्यास घ्यायचाय? मग हे नक्की वाचा...
दंडासन - एकाग्रता आणि श्वसनाच्या सुधारणेसाठी

या नियमावलीत नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत शालेय शिक्षणाच्या विविध स्तरांनुसार या सूचना तयार करण्यात आल्या आहेत. वयोगटानुसारच कृती आराखडे 5+3+3+4 व्यवस्थेवर तयार करण्यात आले आहेत. म्हणजेच 3 ते 8 वर्षे हा पायाभूत स्तर, 8 ते 11 वर्षे हा प्राथमिक स्तर, 11 ते 14 हा मध्यस्तर व 14 ते 18 हा पौंगडावस्था ते प्रौढ वयोगट हा माध्यमिक स्तर अशा वयोगटानुसार कृती आराखडे या नियमावलीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे कृती आराखडे सोपे व सूचक स्वरूपाचे असल्याने त्यात स्थानिक परिस्थिती, आवश्यकता व संदर्भानुसार बदल करता करता येणार आहेत. त्याचबरोबर, कोरोनामुळे आलेला विद्यार्थ्यावरील ताण कमी करण्यासाठी आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी कलाविषयक उपक्रमांची भूमिकाही या नियमावलीत नमूद केली आहे.

पालकांसह कुटुंबातील इतर सदस्यांनी मुलांना सहकार्य करण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या अनेक महत्वाच्या बाबी या नियमावलीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित पालकांसाठीही या नियमावलीत विशेष सूची समाविष्ट केली आहे. अशावेळी कमी शिक्षित पालकांना सहकार्य करण्यासाठी शाळा, शिक्षक आणि स्वयंसेवकांनी या सूचना उपयोगी पडतील.

त्याचबरोबर शाळांनीही पालकांना मुलांना गृहपाठ आणि अभ्यासासोबतच अभ्यासक्रमाशी संबधीत सहकार्य, तसेच इतर बाबी, निर्णय प्रक्रीया, नियोजन याविषयी माहिती देउन सहभागी करून घेण्याची सूचना यात नमूद करण्यात आली आहे. याशिवाय शालापत्रिका, ई-मेल, मेमो य़ा अश्य़ा अनेक माध्यमातून पालकांना संसाधने पुरवण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत. यासाठी शाळा व्यवस्थापन समित्या (SMCs), ग्रामपंचायती, शाळा व्यवस्थापन याच्याकडेही पालकांना विचारणा करता येईल.

नियमावलीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या.

https://dsel.education.gov.in/sites/default/files/update/MoE_Home_Learning_Guidelines.pdf

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com