दंडासन - एकाग्रता आणि श्वसनाच्या सुधारणेसाठी

चटई घेऊन त्यावर पोटावर झोपा. दोन्ही हात छातीजवळ नेऊन खांदे वर घ्या. हातावर वजन टाकून वर उठा व पायांच्याही बोटांना जमिनीला टेकवून अंग जमिनीपासून वर घ्या.
दंडासन - श्वसनक्रिया आणि एकाग्रता वाढविण्यासाठी
दंडासन - श्वसनक्रिया आणि एकाग्रता वाढविण्यासाठीSaam TV
Published On

दंडासन कसे करावे?

चटई घेऊन त्यावर पोटावर झोपा. दोन्ही हात छातीजवळ नेऊन खांदे वर घ्या. हातावर वजन टाकून वर उठा व पायांच्याही बोटांना जमिनीला टेकवून अंग जमिनीपासून वर घ्या.

आता तुम्ही अशा अवस्थेत आहात की जमिन आणि शरीरामध्ये ९० अंशाचा कोन बनेल.

यामध्ये हातावर आणि खांद्यांवर सर्व भार न देता पोटाचे स्नायू आवळून गुरुत्वाकर्षणाविरुध्द शरीर वर उचलून ठेवा. डोकं शरीराप्रमाणे सरळ ठेवून समोर बघा.

या स्थितीत किमान १० सेकंदांपर्यंत किंवा तुमच्या क्षमतेनुसार राहा.

हे देखील पहा -

दंडासनाचे फायदे कोणते?

- हे आसन केल्यास दंड, मांड्या, खांदे आणि मनगट मजबूत होतात.

- ओटीपोटातील स्नायू बळकट होतात.

- ओटीपोट आणि मांड्यांतील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते.

- कमरेचे स्नायू बळकट होतात.

- शरीराची ठेवण उत्तम होण्यास मदत होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com