Nitin Raut Saam Tv
महाराष्ट्र

चर्चेतून तोडगा काढला पाहिजे; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची कर्मचाऱ्यांना विनंती

राज्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काल रविवारी रात्री 12 वाजतापासून दोन दिवसीय संपावर जाण्याचा इशारा दिला.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

मुंबई: राज्यातील महावितरणच्या (MSEDCL) कर्मचाऱ्यांनी काल रविवारी रात्री 12 वाजतापासून दोन दिवसीय संपावर जाण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मेस्मा कायदा लागू केला असून हा प्रस्तावित संप करण्यास मनाई केली आहे. कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आज उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी चर्चेतून तोडगा काढण्याची विनंती केली.

ज्या कर्मचारी संघटना या संपात उतरल्या आहेत त्यांना मी विनंती करतो. चर्चेतून तोडगा काढला पाहिजे. आम्ही खाजगीकरनाविरोधात आहोत. सध्या कडक उन्हाळा आहे. शेतीचा (Farmer) हंगाम सुरु आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहेत. संपामुळे या सगळ्यांवर परिणाम होऊ नये. पण संप घडवून खाजगीकरनाचा डाव आखत असेल तर आम्ही कारवाई करू असा इशाराही राऊत (Nitin Raut)यांनी दिला.

आम्ही चर्चेला तयार आहोत, आर्थिक संकटात असताना यावर मात करत आम्ही पुढे जात आहोत. कोरोना (Corona) काळात वीज कर्मचाऱ्यांनी समोर येऊन सेवा केली हे आम्हाला मान्य आहे. आज वीज (MSEDCL) कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत व्हीसीच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. या प्रश्नावर तोडगा निघेल असं मला वाटते, असही राऊत (Nitin Raut) म्हणाले.

Edited By -Santosh kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या माजी आमदाराला सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका, जन्मठेपेची शिक्षा ठेवली कायम

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना सोसाव्या लागत आहेत पाणीटंचाईचा झळा

'मशीद नाही तर मंदिरच'; धार भोजशाळेच्या विवादावर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

काजू-आंबा उत्पादक आक्रमक, मंत्रालय परिसरात गोंधळ; राजू शेट्टी अन् महादेव जानकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

Pakistan : मोठी बातमी! पाकिस्तानच्या लष्करी कॅम्पवर हल्ला, १५ सैनिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT