आर्यन खानवरील कारवाई संशयास्पद; छगन भुजबळांचा गंभीर आरोप! SaamTV
महाराष्ट्र

आर्यन खानवरील कारवाई संशयास्पद; छगन भुजबळांचा गंभीर आरोप!

धाड टाकतानाचे रेकॉर्डिंग ,पंचनामे आहेत का?...

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : कालच राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक Navab Malik यांनी कॉर्डेलिया क्रुझ पार्टी Cordelia Cruise Party प्रकरण आणि आर्यन खानला अटक करण्याची कारवाई ही एनसीबीने रचलेल्या आणि पेरलेल्या बातम्या असल्याचा आरोप केला होता अशातच आता राष्ट्रवादीचेच जेष्ठनेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी देखील या कारवाई वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोप केले आहेत.(Serious allegations of Chhagan Bhujbal)

हे देखील पहा -

आर्यन खानवरची Aryan Khan कारवाई संशयास्पद असून यामध्ये अनेक भाजपचे कार्यकर्ते BJP Workers दिसत असून भाजपाचे कार्यकर्ते पोलीस कधीपासून झाले ? हा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला तसेच जर एनसीबीने NCB धाड टाकली आहे तर त्यांचे पुरावे Proof काय आहेत धाड टाकतानाचे रेकॉर्डिंग ,पंचनामे आहेत का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

आज ते सप्तश्रृंग गडावरील सप्तश्रृंगी Saptashrungi Devi देवीचं दर्शन घेण्यासाठी आले असतांना पत्रकारांशी बोलताना वरिल आरोप केले आहेत. तसेच राज्यावर आणि देशावर असलेलं कोरोनाचं संकट दूर होऊ दे, असं साकडं यावेळी त्यांनी सप्तश्रृंगी मातेला आपण साकड घातलं असल्याच ते म्हणाले. ज्ञानमंदिरांसोबत आता भक्ती मंदिरंही उघडण्यात आली असून  नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे Corona Rules काटेकोर पालन करावं, असं आवाहन देखील मंत्री भुजबळ यांनी यावेळी केलं.

राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे Heavy Rain शेतकऱ्यांवर संकट ओढवलंय. राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या संकटातून सावरण्याचं बळ शेतकऱ्यांना मिळो, अशी प्रार्थनाही देवीचरणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT