'...त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांध्ये आम्हाला अपयश आलं'; जयंत पाटलांचे स्पष्टीकरणं

भविष्यात आम्ही शक्य असेल त्या महापालिका एकत्र लढणार.
जयंत पाटलांचे वक्तव्यं
जयंत पाटलांचे वक्तव्यंSaamTV
Published On

पुणे : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष NCP State President जयंत पाटील यांनी आज दगडूशेठ गणपतीची Dagdusheth Ganpati आरती केली दर्शन घेतले या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी सवंद साधताना ते म्हणाले तिन्ही पक्षाची ताकद मोठी आहे, मात्र आम्ही एकत्र लढलो नाही त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकामध्ये ZP Elections आम्हाला अपयश आले. मात्र येणाऱ्या काळात आम्ही महाविकास आघाडी एकत्रित लढू तर एकत्रित लढलो तरच आमची ताकद जास्त आहे, त्यामुळे भविष्यात आम्ही जिथे शक्य असेल त्या महापालिका एकत्र लढणार असल्याचं वक्तव्यं त्यांनी केलं.(The Jayant Patil Statements on Zilla Parishad elections)

हे देखील पहा -

राज्य शासनाकडून आज पासून संपुर्ण राज्यातील मंदिर उघडण्याता सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून मंदिर उघडली याचा आनंद तसेच आम्ही स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात गेले असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

जयंत पाटलांचे वक्तव्यं
'पहिले मुख्यमंत्री असतील की जे बोलतात ते त्यांचा पक्षच पाळत नाही'

बदनाम करणे एवढाच उद्देश -

भाजप BJP केवळ आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षढयंत्र करत असून महाविकास आघाडीमधील नेत्यांना MVA LEaders बदनाम करणे एवढा एकच उद्देश भाजपचा आहे. मात्र आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि त्याच कायद्याच्या आधारे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळच Chaggan Bhujbal यांना न्याय मिळाला तसेतअजित पवारांनी Ajit Pawar कशाचीच कागदपत्रे दडवली नाही ते कधी कुठलीच कागदपत्रे दडवत नाहीत असंही ते यावेळी म्हणाले. दरम्पूयान लखीमपूर Lakhimpur दुर्घटनेला भाजप जबाबदार असून भाजपच्या या अत्याचारामुळे संपुर्ण देशातील शेतकरी पेटून उठला आहे असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com