Aurangabad crime माधव सावरगावे
महाराष्ट्र

धक्कादायक! बायकोला स्वयंपाक, साडी नेसता येत नाही म्हणून तरुणानं संपवलं जीवन

औरंगाबादमधील खळबळजनक घटना

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : पत्नी माझ्यापेक्षा वयाने ५ वर्षे मोठी आहे. तिला नीट स्वयंपाक येत नाही. चांगली साडी घालता येत नाही. हॉटेलात (hotel) जेवायला गेल्यावर ती प्लेट उचलून ठेवते, अशी सुसाइड नोट लिहून आय क्विट असे स्टेटस ठेवून २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (self-slaughter) केली आहे आहे. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) शहरातील मुकुंदवाडी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे आहे.

हे देखील पाहा-

अजय समाधान साबळे असे मृत तरुणाचे चे नाव आहे. अजय प्लंबिंगचे काम करत असत. ५ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मात्र, त्यानंतर तो सतत निराश राहायचा. व्हॉट्सअपला सतत निराशजनक स्टेट्स ठेवायचा. मित्रांनी त्याला अनेकदा याबाबत विचारणा केली. मात्र, तो बोलणे टाळायचा. रविवारीही त्याने 'आय क्विट' असे व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले होते. रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घरावरील पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला.

त्यानंतर रात्री १२ वाजता त्याचा मित्र त्याला भेटायला आला. अजय वरच्या खोलीत असल्याचे समजल्यावर तो थेट त्या खोलीकडे गेला असता. तर त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर ही माहिती नातेवाइकांना व मुकुंदवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी आले तेव्हा त्याच्या खोलीत एकपानी सुसाइड नोट आढळून आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Face Cream: घरच्या घरी बनवा बीटरूट फेस क्रिम, आठवडाभरात चेहऱ्यावर दिसेल गुलाबी चमक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Vitamins: वेळीच व्हा सावध! व्हिटॅमिन्सच्या गोळ्या रोज घेणं ठरेल घातक; डॉक्टरांनी सांगितल्या 'या' मर्यादा, आताच घ्या जाणून

MHADA Lottery: खुशखबर! म्हाडाची २००० घरांची लॉटरी! कल्याण-ठाण्यात मिळणार हक्काचे घर; या दिवशी करता येणार अर्ज

Hrithik Roshan Birthday : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत स्टार किडची संपत्ती किती? जगतोय लग्जरी लाइफस्टाइल

SCROLL FOR NEXT