Sanjay Shirsat News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Shirsat News : राज्यातील एका ज्येष्ठ नेत्यानं मराठा आंदोलन चिथवलं; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

Political News : आपल्याला हे आरक्षण देताना सर्व बाजूंचा विचार करावा लागणार आहे.

प्रविण वाकचौरे

Sanjay Shirsat News :

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. एकीकडे विरोधक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना राज्यातील एका ज्येष्ठ नेत्यामुळे हे आंदोलन चिखळल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या नार्कोटेस्टच्या मागणीवर बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं की, जालन्यातील लाठीहल्ल्याच्या सर्वांनीच तीव्र शब्दात निषेध केला आहे. अधिकृत मी सांगू शकत नाही, पण माझ्याकडे पण अशी माहिती आहे की महाराष्ट्रातील एका वरीष्ठ नेत्यांने या आंदोलनाला चिथवणी दिली आहे. तो नेता कोण आहे? याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे. (Political News)

राज्यातील तो बडा नेता कोण?

एखादं आंदोलन चिघळवायचं कसं. महाराष्ट्र पेटवून आपण त्यातून बाहेर कसं पडायचं? हे काही लोकांचं तंत्र आहे. त्याची देखील चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. माझ्याकडे पुरावा असता तर मी नावही सांगितलं असतं. पण ते राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, असं संजय शिरसाट यांना म्हटलं.

सर्वांचीच नार्को टेस्ट करा

माफी मागणे हा पण मोठेपणा आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली हे स्वागतार्ह आहे, योग्य आहे. एकदा सर्वांचीच नार्को टेस्ट करा म्हणजे खरं बाहेर येईल, असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

कुणबी मराठा आरक्षण

कालच्या बैठकीत सकारात्मक भूमिका घेतली आहे. कुणबीमध्ये आरक्षण देता येईल का यावर चर्चा झाली. आपल्याला हे आरक्षण देताना सर्व बाजूंचा विचार करावा लागणार आहे. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावत किंवा समाजात वाद न होता आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे आंदोलन थांबवलं पाहिजे, असं शिरसाट यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

SCROLL FOR NEXT