senior citizen passed away after touching electric pole nandurbar saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात विजेचा शाॅक लागून वयाेवृद्धाचा मृत्यू, घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी

या घटनेची माहिती धडगाव पोलिसांना देण्यात आली आहे. वयाेवृद्धाचा मृत्युदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

नंदुरबार जिल्ह्यातील जुने धडगाव परिसरात असलेल्या महादेव मंदिर टेकडी जवळ विजेच्या शॉक लागून एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनूसार या वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनूसार जुने धडगाव परिसरात असलेल्या महादेव मंदिर टेकडी जवळ शेळ्यांसाठी चारा गोळा करण्यासाठी एक व्यक्ती गेली हाेती. चारा गोळा करताना त्याचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला आणि त्यास विजेचा झटका लागला.

या घटनेत वयोवृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी वृद्धाचे नातेवाईक देखील तेथे पाेहचले. यावेळी नातेवाईकांनी आक्राेश केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान वयाेवृद्धाचा मृत्यू झाल्याने शासनाने त्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेची माहिती धडगाव पोलिसांना देण्यात आली आहे. वयाेवृद्धाचा मृत्युदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती स्थानिकांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेत्याची भररस्त्यावर गोळ्या झाडून हत्या, कुटुंबाला वेगळाच संशय, हत्येमागे भाजपचा हात असल्याचा आरोप

Maharashtra Live News Update: 'जीआर रद्द करावा' जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता परिषदेकडून निदर्शने

Kolhapur Gazette : जरागेंना बळ मिळाले! मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री, कुणबी अन् मराठाबाबत महत्त्वाची नोंद

Taloda Heavy Rain : तळोदा तालुक्यात अतिवृष्टी; २४ तासांपासून पावसाची संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Viral Video : क्षुल्लक कारणावरून सुरू झालं भांडण नंतर दे दणादण; त्या हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT